pmc 
पुणे

कोरोना रुग्णांकडून पैसे घेणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई सुरू 

ज्ञानेश सावंत - सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी हॉस्पिटलमधील खाद्यपदार्थांचा दर्जा, त्याच्या किमतीवर महापालिकेने नजर ठेवली आहे. रुग्णांना खाद्यपदार्थ अर्थात जेवण देऊन त्याचे पैसे वसूल केलेल्या हॉस्पिटलच्या बिलांची महापालिकेने वजाबाकी सुरू केली आहे. एका हॉस्पिटलच्या बिलातील खाद्यपदार्थांचे 10 हजार रुपये कमी केले असून त्यांना नोटीसही दिली आहे. रुग्णांकडून जेवणाचे पैसे घेऊ नका, अशी तंबीच महापालिकेने खासगी हॉस्पिटल व्यवस्थापनाला मंगळवारी पुन्हा दिली. याकडे काणाडोळा करणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. 

कोरोनाच्या उपचारासाठी भरमसाट म्हणजे, दीड लाखांपेक्षा अधिक बिल दिलेल्या खासगी हॉस्पिटलची बिले तपासून ती कमी करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली. साधारण उपचार (आयसीयू, ऑक्‍सिजन वगळता) घेतलेल्या रुग्णांच्या बिलांची पडताळणी केली जात असून, त्यासाठी पहिल्या टप्प्यात 25 हॉस्पिटलमध्ये सहायक आरोग्य प्रमुखांची समिती नेमली आहे. आतापर्यंत तपासलेल्या काही हॉस्पिटलने रुग्णांकडून जेवणाचे पैसे घेतल्याचे निदर्शनास आले. महापालिकेने रुग्णाचा उपचारासह राहणे, खाणे यांचा एक दिवसाचा साधारण खर्च चार हजार रुपये ठरविला आहे. तरीही काही हॉस्पिटलनी बिलाची रक्कम वाढविताना खाद्यपदार्थांचा समावेश केला आहे. 
या पार्श्‍वभूमीवर खाद्यपदार्थांचे पैसे प्राधान्याने कमी करणार आहे. त्यामुळे रुग्णांचे 10 ते 15 हजार रुपये वाचत असल्याचे महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. मनीषा नाईक यांनी सांगितले. 

खाद्यपदार्थांचा दर्जाही तपासणार 
उपचार खर्चापाठोपाठ हॉस्पिटलमध्ये जेवणासाठीही जादा पैसे घेतल्याची वस्तुस्थिती बिलांच्या पडताळणीतून पुढे आली आहे. काही हॉस्पिटलनी तर रुग्णाला पुरविलेला नाष्टा आणि दोन वेळच्या जेवणाचे दिवसाला एक हजार रुपये घेतल्याचे दिसून आले आहे. तरीही, जेवणाचा दर्जा राखला जात नाही, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे खाद्यपदार्थांचा दर्जाही तपासणार आहे. रुग्णांच्या सोयीसाठी याकडे लक्ष देणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उपचार खर्चासाठी ठरविलेल्या किमान रकमेतून रुग्णांना जेवण पुरविणे अपेक्षित आहे. परंतु, त्याचेही पैसे घेतल्याचे बिलांवरून दिसत आहे. ती कमी करण्यात येत असून, यापुढे एकूण बिलात जेवणाच्या खर्चाचा समावेश नसावा, अशी सूचना सर्व हॉस्पिटल व्यवस्थापनाला केली आहे. 
- डॉ. मनीषा नाईक,  सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT