Action taken by pune Municipal Corporation on 28 dangerous buildings 
पुणे

धोकादायक अठ्ठावीस इमारतीवर महापालिकेकडून कारावाई

पावसाळ्यापूर्वी चारशे एकोणतीस इमारतींना नोटिस

समाधान काटे

शिवाजीनगर - महापालिका हद्दीतील अठ्ठावीस जुन्या धोकादायक इमारती या वर्षी महापालिकेने जमिनदोस्त केल्या आहेत.पावसाळा सुरू झाला की, या इमारती खाली पडून रहिवाशांना,शेजाऱ्यांना,ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका असतो.त्यामुळे महापालिकेच्या वतीने पावसाळा सुरू होण्यापूर्वी संबंधित रहिवाशांना नोटीस देऊन सतर्क केले जाते.

भाडेकरू,आवश्यकतेनुसार कारवाई देखील करण्यात येथे.शहरात झोन सात म्हणजेच नाना पेठ, सदाशिव पेठ, भवानी पेठ, रास्त पेठ,कसबा पेठ, या भागांमध्ये धोकादायक इमारती आहेत.जुन्या इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांचे तीन भागात वर्गीकरण केले जाते ते पुढीलप्रमाणे. सी एक यामध्ये आति धोकादायक इमारती येतात कधीही कोसळू शकतात,त्यामुळे त्या इमारती पाडून टाकाव्या लागतात.सी दोन धोकादायक इमारती यामध्ये इमारतींची महत्वाची देखभाल दुरुस्ती करून घेणे आवश्यक असते.सी तीन यामध्ये किरकोळ देखभाल दुरुस्ती करून घेणे गरजेचे असते.

पावसाळ्यापूर्वी विविध वर्तमानपत्र जाहिरात देतो.यामधून लोकांना सांगण्यात येते धोकादायक इमारती खाली करा.धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या भाडेकरुना महापालिकेच्या वतीने भाडेकरू प्रमाणात दिले जाते.ज्या धोकादायक इमारती आहेत, अशा रहिवाशांनी महापालिकेच्यावतीने प्रमाणपत्र घेऊन इमारत खाली करून सहकार्य करावे.रहिवाशांचा वेळही वाचेल आणि हक्क पण जाणार नाही.अनेक भाडेकरू रहिवाशांनी सहकार्य केल्यामुळे अठ्ठावीस इमारती खाली करु शकलो.

- प्रवीण शेंडे कार्यकारी अभियंता झोन सात.

अचानक दुर्घटना घडली तर घाबरून जाऊ नये.अशा वेळी वयोवृद्ध, लहान मुले यांना सुरक्षित स्थळी घेऊन जावे.महत्वाचे फोन नंबर,उदा आपत्ती व्यवस्थापन, अग्नीशामक, पोलिस इतर आपल्याकडे असावे .गरजेपुरती सामग्री सोबत असावी.दररोजचा हवामान अंदाज लोकांना सहज उपलब्ध होतो त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे.पुराचा धोका असेल तर अगोदरच स्थालांतर करावे.

- सचिन इथापे उपायुक्त आपत्ती व्यवस्थापन.

महापालिकेच्या वतीने जानेवारी महिन्यातच आमच्या कसबा पेठेतील धोकादायक वाड्याला नोटीस दिली होती.आधिकाऱ्यांनी वाडा पाडण्यासाठी आम्हाला सांगितले असता आम्ही वाडा खाली करण्यास संमती दिली.वाड्याला शंभर वर्षे उलटून गेली होती.कोणतीही दुर्घटना होण्या अगोदर नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करायला हवे.

- देवेंद्र वडके, रहिवासी.

वर्गवारी. इमारती. कारवाई

सी एक - २८ २८

सी दोन - ३१६. १२

सी तीन - १३४. ९

आपल्या भागातील इमारत आकस्मितरित्या कोसळल्यास महापालिका हेल्पलाइन नंबर.०२०-२५५०१०००, कसबा पेठ अग्नीशामक केंद्र हेल्पलाइन नंबर .०२०-२४५७८९५०, भवानी पेठ.०२० -२६४५१७०७ तसेच १०१ वर तात्काळ मदतीसाठी संपर्क साधावा.

सन २०१२ साली कसबा पेठेत धोकादायक इमारत पडून दुर्घटना झाली होती.त्या दुर्घटनेत जेष्ठ महिला व लहान बाळाचा मृत्यू झाला होता. सबंधीत रहिवाशांना महापालिकेच्या वतीने नोटीस बजावण्यात आली होती.मात्र रहिवाशांनी वेळीच इमारत खाली न केल्याने दुर्घटना घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT