Hapus Mango sakal
पुणे

Hapus Mango : इतर राज्यातील आंबा ‘देवगड हापूस' नावाने विकल्यास कारवाई

हापूस खरेदी करताय तर या गोष्टी तपासा.

प्रवीण डोके

मार्केट यार्ड - दरवर्षी आंबा हंगामात कोकणातील हापूस अंब्यासोबत इतर राज्यातील आंबा देखील मोठ्या प्रमाणात दाखल होतो. त्यामुळे इतर राज्यातील आंबा कोकणातील ’देवगड हापूस’ किंवा ’कोकण हापूस’ म्हणून विकल्याचा प्रकार होतो. त्यामुळे ग्राहकांनी हापूस खरेदी करताना तो कोकणातील हापूसच आहे याची खात्री करून तो खरेदी करावा.

इतर राज्यातून आलेल्या आंब्याची 'देवगड हापूस', ‘कोकण हापूस’ या नावाने विक्री केल्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी बाजार समितीने परिपत्रक काढले आहे. इतर राज्यातील आंबा 'कोकणातील हापूस’ नावाने विकल्यास संबधित व्यापाऱ्यचा आंबा जप्त करुन दंड, परवाना निलंबित किंवा परवाना रद्द करण्याची कारवाई देखील करण्यात येणार आहे.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये कोकणचा राजा अर्थात हापूस आंब्याची देवगड, रत्नागिरी येथून आवक होते. त्याशिवाय केरळ, गुजरात, कर्नाटक यासह इतर राज्यातून आंबा येतो. मात्र, इतर राज्यातील आंबा आणि कोकणातील आंब्याच्या चवीत आणि सालीमध्ये फरक आहे. कोकणातील हापूस आंबा रसाळ आणि चवीस चांगला असतो.

त्यामुळे कोकणातील आंब्यांना सर्वाधिक मागणी असते. म्हणूनच या आंब्याच्या किंमतीही जास्त असतात. याचा फायदा घेत व्यापारी, विक्रेते ग्राहकांची फसवणूक करतात. आंब्यांची अदलाबदल करून विक्री करतात.

मागील वर्षीचा हंगामाच्या सुरवातीला पुणे बाजार समितीत कर्नाटक, केरळ येथून आलेला आंबा हा ‘देवगड हापूस' या नावाने लेबल लाऊन विक्री करतानाचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे राज्याच्या पणन संचालकांनी याबाबत तपासणी करून कारवाईच आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर यंदाही बाजार समितीने ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत.

असा ओळखा हापसू

हापूस आंब्याला एक नैसर्गिक सुंगध असतो. हापूस आतून केशरी आणि त्याची साल पातळ असते. हापूस तुलनेत जास्त रसाळ असतो आणि त्याचा आकार थोडासा उभट असतो. तर याबाबी तपासूनच ग्राहकांनी हापूस विकत घ्यावा.

ग्राहकांना कोकणातील दर्जेदार हापूस आंबाच मिळावा. तसेच उत्पादक शेतकऱ्यांना देखील योग्य मोबदला मिळावा यासाठी बाजार समिती प्रयत्नशील आहे. परराज्यातील आंबा हा महाराष्ट्र राज्यात उत्पादित झालेला आहे किंवा 'कोकण हापूस' आहे असे भासवुन विक्री करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे याबाबत कारवाईचे आदेश बाजार समितीने दिलेले आहेत.

- दिलीप काळभोर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

इतर राज्यातील आंब्याच्या पॅकींगमध्ये रद्दीमध्ये बदल करुन तो आंबा रत्नागिरी, देवगड हापूस कोकणचा असल्याचे भासविणे अशा प्रकारचे कृत्य करणे बेकायदेशीर आहे. असे प्रकार आढळून आल्यास आंबा बाजार समिती जप्त करुन संबधितावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच अडत्याची परवानगी निलंबित किंवा रद्द करण्यात येईल.

- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

SCROLL FOR NEXT