Mcoca crime Sakal
पुणे

Crime News : हडपसरमधील अमोल शेलार टोळीविरुद्ध मोका कायद्यांतर्गत कारवाई

हडपसर परिसरात सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या आंतर जिल्हा टोळीविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाई केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - हडपसर परिसरात सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या आंतर जिल्हा टोळीविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

टोळीप्रमुख अमोल भास्कर शेलार (वय २५, रा. नेवासा फाटा, जि. अहमदनगर), स्वप्नील ऊर्फ भावड्या ईश्वर केंदळे (वय २९, रा. संभाजीनगर, नेवासा, जि. अहमदनगर), अमर चिल्लू कांबळे (वय ३५, रा. नेवासा, जि. अहमदनगर) आणि विजय रामकृष्ण देडगावकर (वय ६३, रा. कोल्हार, ता. राहाता, जि. अहमदनगर) अशी मोका कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी परिसरात चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळी हिसकावून नेली होती. याबाबत हडपसर पोलिसांनी तिघांना अटक केली. तपासात चोरट्यांनी सराफ व्यावसायिक देडगावकर यांना दागिने विकल्याची माहिती मिळाली. त्यावरून सराफ व्यावासायिकावरही मोकांतर्गत कारवाई केली आहे.

या टोळीने पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात जबरी चोरी, दरोडा असे गंभीर गुन्हे केले आहेत. हडपसरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी या टोळीविरुद्ध मोकांतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्याकडे पाठविला. याबाबत पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शेलार टोळीवर मोकांतर्गत कारवाईचे आदेश दिले. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख-केदार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटनेत ७० तासांनतरही बचावकार्य सुरु! ढिगाऱ्याखाली ३ जण जिवंत दिसले, सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोशीच्या दुर्घटनास्थळाला देणार भेट

Pune Palkhi Sohala : विठू नामाचा गजर अन् डोळ्यात पाणी! दोन दिवसांच्या मुक्कामानंतर माऊली-तुकोबांची पालखी पंढरीकडे मार्गस्थ, पुण्यनगरी भावुक, 'असा' दिला निरोप

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड वनडे मालिका 'या' तारखेपासून ; जाणून घ्या कुठे, किती वाजता अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री पहिली मॅच...

FDA Milk Raid Rumour : तुकाराम मुंडेंची एवढी भीती? FDA धाडीच्या एका अफवेने दूध चालकांनी शेकडो लिटर दूध ओतलं रस्‍त्‍यावर; 'त्या' व्हिडिओनं वाढवलं दुधातील भेसळीचं गूढ

SCROLL FOR NEXT