पुणे

वाकडेवाडीतील टपऱ्या व हातगाड्यांवर अखेर कारवाई 

सकाळवृत्तसेवा

खडकी - वाकडेवाडी येथील वोडाफोन इमारतीच्या चौकात गेली काही वर्षे ठाण मांडून बसलेल्या टपऱ्यांवर अखेर मंगळवारी (ता. 23) महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली. या टपऱ्यांचे रस्त्याच्या पलीकडे शासकीय दूध डेअरीजवळच्या पदपथावर पुनर्वसन करण्यात आले. 

दुपारी एकच्या सुमारास अतिक्रमण विभागाच्या दोन क्रेन आणि कर्मचाऱ्यांनी या टपऱ्या हटवून रस्त्याच्या पलीकडे उचलून नेल्या. या वेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यात काही टपऱ्यांचे नुकसान झाले. याबाबत अतिक्रमण विभागाने टपरीधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र त्याविरुद्ध घोले रोड क्षेत्रिय कार्यालयाकडे धाव घेतली होती. एकूण सात टपऱ्या व तीन हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. त्यातील दोन टपऱ्यांची प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने त्यांना हलवण्यात आले नाही. 

अतिक्रमण विभागाचे निरीक्षक गणेश तारू म्हणाले, नियमानुसार कारवाई होत आहे. संबंधितांना यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. टपऱ्यांचे पत्रे आधीपासून गंजलेले आहेत त्यामुळे भरपाई देण्याचा प्रश्नच येत नाही. 

स्थानिक रहिवासी प्रशांत जाधव म्हणाले, कारवाई केली तर सरसकट सगळ्या टपऱ्यांवर केली पाहिजे. जे बोलत नाहीत त्यांच्यावरच कारवाई होते. मात्र कोणी तरी तक्रार दिल्याने या टपऱ्यांवर कारवाई झाली असावी. 

आमच्या टपऱ्या न हलवण्याची आम्ही विनंती केली होती. यावर आमचे पोट आहे, आता त्या हलवल्या आणि अशा जागी ठेवल्या जिथे आम्हाला गिऱ्हाईकपण मिळणार नाही. आता आम्ही घर कसं चालवायचं. नुकसान झालेल्या टपऱ्या दुरुस्तीला तीस-चाळीस हजार कुठून आणायचे. सरकार गरिबांच्या मागेच का लागते? 
- आशाबाई शेलार, टपरीचालक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT