पुणे

डॉक्टरांनो, दवाखाने उघडा, नाहीतर कारवाईला सामोरे जा 

सकाळवृत्तसेवा

पुणे - रुग्णाला वैद्यकीय सेवा न देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई केली जाईल, अशी तंबी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. रुग्णसेवा न देणाऱ्या डॉक्टरांनी नोंदणीही रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हपूर आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

कोरोना विषाणू हा तीव्र संसर्गजन्य आहे. त्याचा फैलाव नियंत्रित करण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. काही डॉक्टर कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने वैद्यकीय सेवा देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ते बाह्यरुग्ण विभाग आणि रुग्णालये बंद ठेवत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय सेवा सुरळीत ठेवण्याबद्दलचे आवाहन या पत्रातून डॉ. म्हैसेकर यांनी केले. 

डॉक्टरांना दिलेल्या निर्देशाचे उल्लघन करणाऱयांवर कारवाई करण्याचे आदेशही यात दिले आहेत. वैद्यकीय सेवा न देणाऱ्या डॉक्टरांवर आपत्ती व्यवस्थापन २००५ व महाराष्ट्र कोविड उपाययोजना २०२० व साथरोग अधिनियम १८९७ या आधारावर कारवाई करण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांनी दिली आहे. 

वैद्यकीय सेवा न देणाऱ्या डॉक्टरांची नोंदणी भारतीय वैद्यक परिषद (आयएमसी) तसेच, आवश्यक त्या सक्षम प्राधिकरणास कळविण्याच्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या आहेत. 

आपल्या जिल्ह्यातील सर्व दवाखाने, त्यातील बाह्यरुग्ण विभाग, रुग्णालये नियमित सुरू रहातील, याची दक्षता घेण्याचेही त्यांनी पत्रात ठळकपणे नमूद केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT