Action Will Taken on bungalows built as a forest house in Khadakwasla Pune City 
पुणे

खडकवासल्यात 'वनघर' म्हणून बांधले अलिशान बंगले; आता कारवाई होणार

सकाळवृत्तसेवा

किरकटवाडी : खासगी वनीकरण शेरा असलेल्या जागेवर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 'वनघर' बांधण्याची परवानगी घेऊन त्याठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पायदळी तुडवत अलिशान बंगले उभे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार खडकवासला येथे समोर आला आहे. याप्रकरणी खडकवासला मंडलाधिकारी आणि तलाठी यांनी 26 बेकायदा बांधकामांचा स्थळपाहणी अहवाल हवेली तहसीलदार सुनील कोळी यांच्याकडे सादर केला आहे.


2006 साली खडकवासला गावच्या हद्दीत खाजगी वनीकरण शेरा असलेल्या वाईल्डरनेस्ट सोसायटीच्या जागेवर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांच्या अर्जावरुन 'वनघर' म्हनून बांधकाम व वापरास परवानगी दिली होती. सदर परवाणगी देताना जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेले नियम संबंधितांनी सर्रासपणे डावलले असल्याचे दिसून आले आहे. नियमानुसार  एक एकर क्षेत्रावर केवळ 100 चौरस मीटर बांधकामाची परवानगी असताना प्रत्यक्षात मात्र प्रत्येक प्लॉट धारकाने त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त बांधकाम केलेले दिसत आहे. नियमभंग करून बांधकाम केल्याचा व इतर आदेश मोडल्याचा अहवाल तहसीलदारांना सादर करण्यात आला आहे. 

व्यावसायिक कारणासाठीही होतोय वापर
संबंधित जागेचा वनघराशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी वापर करता येणार नाही असे परवाणगी देताना जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे नमूद केलेले असताना त्याठिकाणी भव्य रिसॉर्ट उभे करण्यात आलेले आहे. प्रशासनाचे आदेश मोडून जागेचा व्यावसायिक वापर सुरू आहे.

आजपर्यंत कारवाई का करण्यात आली नाही?
सदर ठिकाणी बंगले, कुंपण, रिसॉर्ट अचानक तयार झालेले नाहीत. अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना महसूल विभागाने अद्यापपर्यंत कारवाई का केली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. जे नियम सर्वसामान्य नागरिकांना दाखवले जातात  तेच धनदांडग्यांच्या विरोधात वापरले जावेत अशी मागणी खडकवासला गावचे सरपंच सौरभ मते यांनी केली आहे.   

परिसरात अनेक ठिकाणी नियमांचा भंग
खडकवासला, डोणजे व सिंहगडाच्या आजुबाजुच्या परिसरात 'वनघर' म्हणून परवाणगी घेऊन अलिशान बांधकामे करण्यात आलेली आहेत. प्रशासन कारवाई करत नसल्याने असे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.त्यामुळे नियम केवळ कागदावरच राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

''नियम मोडून बांधकामे करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. संपूर्ण क्षेत्राला कुंपण केल्याने वन्यप्राण्यांचा अधिवास नष्ट झाला आहे. संबंधित प्लॉट धारकांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी स्थळपाहणी अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.''
- धनश्री हिरवे, तलाठी, खडकवासला.

''संबंधित प्रकरणाची सखोल माहिती घेण्यात येईल व चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.''
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची बैठक सुरु, अडचणींवर व नियोजनाबाबत होणार चर्चा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT