social-Media.jpg
social-Media.jpg 
पुणे

Ayodhya Verdict : सोशल मिडियावर पोलिसांची नजर; गृप 'अॅडमीन'ला सुचना 

सकाळ वृत्तसेवा

सर्वोच्च न्यायालयाच्या आयोध्या निकालप्रकरणी सोशल मिडीयावर पोलिसांचे लक्ष, '

पुण : आयोध्येतील रामजन्मभुमी व बाबरी मशीदीच्या जमीन मालकीच्या निकालाप्रकरणी व्हॉटस्अॅप, फेसबुकस अन्य कोणत्याही सोशल मिडीयावर आक्षेपार्ह व्हिडीओ, छायाचित्र व संदेशांची देवाण-घेवाण करु नये, यासंदर्भात सर्व ग्रुप अॅडमिनला पोलिसांनी कडक सुचना दिल्या आहेत. त्याचे उल्लंघन केल्यास संबंधीत व्यक्ती किंवा समुहाविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर चांगल्या किंवा वाईट प्रतिक्रीया व्हॉटसअप, फेसबुकसह इतर सोशल मिडीया, पत्रकबाजीमध्ये टिका टिपण्णी करू नये. सर्व नागरीकांनी विशेषतः सोशल मिडीयाचा वापर करणारे नागरीक, व्हॉटस्‌अप, फेसबुक ऍडमीन यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन दिलेल्या सुचनांचे पालन करावे. संबंधीत सुचनांचे उल्लंघन केल्यास, जातीय तणाव निर्माण केल्यास, धार्मिक भावना भडकाविल्यास संबंधीत व्यक्ती किंवा समुहाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला होता. 

दरम्यान, पोलिसांनी फेसबुक, व्हॉटस्‌अपच्या ग्रुप ऍडमीनवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. कोणत्याही ग्रुपवरुन आक्षेपार्ह व्हिडीओ, छायाचित्र, संदेश प्रसारीत झाल्यास किंवा ते पुढे फॉरवर्ड करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाईल, अशा सुचना संबंधीत ग्रुप ऍडमिनला देण्यात आले असल्याची माहिती सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी सांगितले. 

आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो, मेसेज पाठविणाऱ्यांची माहिती कळवा 
कोणीही आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो किंवा संदेश पाठविल्यास नागरीकांनी इतरांना न पाठविता ब्लॉक करावे किंवा डिलीट करावेत.तसेच असे मेसेज पाठविणाऱ्यांची माहिती पुणे पोलिस, सायबर पोलिस ठाणे (020-29710097) यांना तसेच व्हॉटस्‌अप क्रमांक 8975953100 किंवा 8975283100 या क्रमांकावर कळवावी, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे. 

सोशल मिडीया वापरताना या सुचना पाळाव्यात 
- धार्मिक भावना दुखावतील असे मेसेज प्रसारीत करु नये 
- धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देषाने घोषणाबाजी/जल्लोष करु नये 
- या प्रकरणामध्ये फटाके वाजवू नयेत 
- मिरवणुका काढू नये, अभिनंदन व निषेधाचे फलक लावू नयेत 
- जातीय द्वेष पसरविण्याच्या उद्देशाने जुने, आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो पुन्हा प्रसारीत करु नये 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT