astromomy 
पुणे

तुम्हीच निवडा ग्रह-ताऱ्याचे नाव 

सकाळ वृत्तसेवा

पुणे - आत्तापर्यंत आपण लहान मुलांच्या अथवा आपल्या घराच्या नावाची निवड केली असेल; पण आता चक्क ग्रह आणि ताऱ्याच्या नावाची निवड करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. पृथ्वीपासून 340 प्रकाशवर्षे दूर असलेल्या "एचडी 86081' या ताऱ्यासाठी आणि "एचडी 86081 बी'या ग्रहासाठी भारतीयांनी सुचवलेल्या नावातील पाच- पाच नावे अंतिम यादीत निश्‍चित करण्यात आली आहेत. त्यातील एका नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी गुरुवार (ता. 31) पर्यंत ऑनलाइन पद्धतीने मत विचारात घेण्यात येणार आहे. 

ब्रह्मांडात नव्याने शोधलेल्या ग्रह, ताऱ्यांना नाव देण्याची संधी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघ (आयएयू) प्रत्येक देशाला उपलब्ध करून देते. त्याअंतर्गतच भारतीय ज्योतिर्विज्ञान संस्था आणि आयएयूने ही नावे सुचविण्यासाठी नागरिकांना यापूर्वीच आवाहन केले होते. त्यानुसार आलेल्या नावातून संस्कृत आणि बंगाली भाषेतील प्रत्येकी पाच नावांची अंतिम यादीसाठी निवडण्यात आली. आपल्याच आकाशगंगेत असलेल्या "एचडी 86081'या ताऱ्यासाठी अनाहत, बीभा, रश्‍मीरथी, सुतेज आणि विभास, तर "एचडी 86081 बी' या ग्रहासाठी अभ्रकासिन, आलेया, संतमस, तप्तबृहस आणि तुरंग अशी नावे अंतिम यादीसाठी निवडण्यात आली आहेत. या पैकी आपल्या पसंतीच्या नावाला मत देण्यासाठी नागरिकांनी https://astron-soc.in/outreach/activities/name-exoworlds/ या संकेतस्थळा भेट द्यावी. 

नाव देण्याची संधी, तरुणांच्या देशाला - आयएयू 
ब्रह्मांडात नव्याने शोध लागलेल्या घटकाला नाव देण्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाकडे आहे. संघाच्या शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने "एचडी 86081' या ताऱ्याला आणि "एचडी 86081 बी' या ग्रहाला नाव देण्याची संधी तरुणांचा देश असलेल्या भारताला देण्यात आली आहे, असे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे. 

"एचडी 86081बी' ग्रहाची वैशिष्ट्ये 
- 2006 मध्ये शोधण्यात आलेला हा ग्रह वायूंपासून बनलेला आहे. 
- सूर्याभोवती एक चक्कर मारण्यासाठी त्याला साधारणपणे दोन दिवस लागतात. 
- वजनाने गुरू ग्रहाच्या दीडपट असलेला हा ग्रह पृथ्वापासून 340 प्रकाशवर्षे दूर आहे. 

"एचडी 86081' ताऱ्याची वैशिष्ट्ये 
- एफ-8 प्रकारात मोडणाऱ्या या ताऱ्याचा रंग पिवळा आणि पांढरा आहे. 
- 6.2 अब्ज वर्षांपूर्वी ताऱ्याची निर्मिती झाली असावी, असा अंदाज आहे. 
- त्याचे वस्तुमान आपल्या सूर्याच्या 1.21 पटीने जास्त आणि आकाराने दीडपट. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT