Subodh Bhave Pune Sakal
पुणे

लायकी नसलेल्या राजकारण्यांच्या हाती आपण देश उभारणीचं काम दिलंय - सुबोध भावे

चांगली नोकरी मिळून परदेशी स्थायिक कसं होता येईल, याचाच आपण विचार करत असतो, अशी खंतही सुबोध भावे यांनी व्यक्त केली आहे.

वैष्णवी कारंजकर

सध्याच्या राजकारणावर अभिनेता सुबोध भावे यांनी चांगलेच ताशेरे ओढले आहेत. लायकी नसलेल्यांच्या हाती आपण देश दिला असल्याची खंत सुबोध भावे यांनी व्यक्त केली आहे. तसंच आपण सगळे चांगलं शिक्षण घेऊन परदेशी स्थायिक कसं होता येईल, याचाच विचार करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

पुण्यातल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस प्री प्रायमरी स्कूलतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सुबोध भावे बोलत होते. आपण सगळे चांगलं शिक्षण घेऊन सतत करियरच्या मागे धावत आहोत. मला चांगली नोकरी कशी मिळेल, परदेशी जाऊन स्थायिक कसं होता येईल, याचाच विचार आपण करत आहोत. ज्या राजकारण्यांची लायकी नाही, अशांच्या हातात आपण देश उभारणीचं काम दिलं आहे, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केलीये.

त्याचबरोबर 'आपल्याला असं वाटतंय की ते जे नालायक राजकारणी आहेत ते आपल्या देशाचा विचार करतील.. पण त्यांनी मागच्या काही वर्षांत जे काही करुन ठेवलंय ते आपल्या समोर आहे, असंही सुबोध भावे म्हणालेत. स्वातंत्र्यपूर्व काळात टिळक आणि आगरकर ज्या पद्धतीने देशाचा विचार करायचे तसं आता होताना दिसत नाही असं म्हणत सध्याचे राजकारण आणि राजकारणी यांच्यावर सुबोध भावे यांनी टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT