पुणे

१५५ रुग्णांना मोफत अॅक्युप्रेशर उपचार; शिबिराचा समारोप

CD

JAM26A01051
जामखेड ः ॲक्युप्रेशर शिबिराच्या उद्‍घाटन प्रसंगी नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, डॉ. एम. ए. चायनान, डॉ. सादेख पठाण, प्रफुल सोळंकी, अरुण उगले आदी.

ॲक्युप्रेशर औषधांशिवाय आरोग्यासाठी उपयुक्त
प्रांजल चिंतामणी ः रोटरी क्लबच्या उपक्रमाचे कौतुक
जामखेड शहर, ता. ७ ः आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे ताणतणावांसह कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी या सारख्या विविध आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत. अशा परिस्थितीत ॲक्युप्रेशर ही कोणत्याही औषधांशिवाय आरोग्यासाठी उपयुक्त उपचारपद्धती आहे. रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीने आयोजिलेले शिबिर कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटी आयोजित ॲक्युप्रेशर उपचार शिबिराचा समारोप आयोजिलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. ल. ना. होशिंग विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे प्रमुख पाहुणे होते.
३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान आयोजित शिबिरात १५५ रुग्णांनी उपचाराचा लाभ घेतला. या शिबिरासाठी तज्ज्ञ डॉ. एम. ए. चायनान व त्यांच्या टीमने रुग्णांना ॲक्युप्रेशर उपचार देत विशेष सहकार्य केले.
नुकताच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राचार्य बाळासाहेब पारखे यांचा रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरीचे अध्यक्ष डॉ. सादेख पठाण, उपाध्यक्ष प्रफुल सोळंकी, सचिव अरुण उगले, मार्गदर्शक डाॅ. प्रशांत गायकवाड, विकास पवळ, प्रसिद्धी प्रमुख धनराज पवार, प्रा. संभाजी मुळे, सुनील उगले, बाळासाहेब पेचे, केतन चोरडिया, महिला प्रतिनिधी डाॅ. पल्लवी गायकवाड, मत्स्यगंधा उगले, नीलम उगले आदी उपस्थित होते. डॉ. सादेख पठाण यांना प्रास्ताविक केले. प्रफुल सोळंकी यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब पेचे यांनी आभार मानले.
-----------
आरोग्य चांगले राहण्यासाठी आहार, विहार आणि निद्रा ही आरोग्याची त्रिसूत्री प्रत्येकाने अंगीकारणे गरजेचे आहे. रोटरी क्लबच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये यापुढेही माझा सक्रिय सहभाग राहील.
-बाळासाहेब पारखे, प्राचार्य, ल. ना होशिंग विद्यालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: गर्भवती असतानाही Mains दिली; 26 दिवसांच्या बाळाला कडेवर घेऊन मुलाखत दिली अन् थेट DSP झाली!

स्टेशनवर गर्दी, ट्रेनमध्ये चढण्याऐवजी वृद्ध थेट इंजिनवरच उभा राहिला; VIDEO VIRAL

जरागेंच्या उपोषणाचा १० वा दिवस, प्रकृती खालावल्यानं मराठा बांधवांचा सरकारला इशारा | Jarange Patil

Marathi News Live Updates : सर्वोच्च न्यायालयाने अरावली पर्वताबाबत अहवालाची मुदत वाढवण्याची याचिका फेटाळली

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या चार तालुक्यांचा होणार कायापालट; आकांक्षित तालुका योजनेत प्रत्येकी ५ कोटींचा अतिरिक्त निधी

SCROLL FOR NEXT