Aadam Sayyed 
पुणे

आदम सय्यद यांचा जागतिक विक्रम; कौशल्य विकास प्रशिक्षण क्षेत्रात रोवला झेंडा   

सकाळ डिजिटल टीम

भारतासह अन्य १८ देशांमधील एकूण ५,००० मनुष्यबळ विकास (Human Resource) अधिकाऱ्यांना TSPL ग्रुपच्या माध्यमातून ४५० तासांचे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण (प्रोफेशनल स्किल डेवलोपमेंट ट्रेनिंग) देण्यात आले. कौशल्य विकास प्रशिक्षण क्षेत्रात हे पहिल्यांदाचं घडलं आहे. पुण्यातील विमाननगर येथील आदम सय्यद (Aadam Sayyed) यांनी हा विश्वविक्रम केला असून त्यांच्या विक्रमाची नोंद लंडन येथील 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड' (World Book Of Record) या जागतिक विश्वविक्रम संस्थेकडून घेण्यात आली आहे. 

आदम सय्यद यांच्या संयोजनाद्वारे TSPL (Talentcorp Soulation Private Limited) ग्रुपचे संस्थापक महेबूब सय्यद यांच्या नियोजनातून विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हुमन रिसोर्स (HR) अधिकाऱ्यांकरता ऑनलाईनद्वारे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतासह अन्य १८ देशांमधील एकूण ५००० ह्युमन रिसोर्स अधिकाऱ्यांकरता ४५० तासांचे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आले. जागतिक पातळीवर अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच घडल्याने याची नोंद लंडन येथील 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड' या जागतीक विक्रम संस्थेतर्फे घेण्यात आली.

मराठी बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावेत यासाठी वेळोवेळी रोजगार मेळाव्याचे आयोजन करून रोजगाराच्या आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या क्षेत्रात २०२१ या वर्षात किमान दहा हजार तरुणांना मोफत रोजगार देण्याचा संकल्प आदम सय्यद यांनी केला आहे. यंदा कोमेडियन कपिल शर्मा, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कामगिरीची नोंद देखील 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये या वर्षी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

Pune Bengaluru Highway: गणपती बाप्पांना निरोप अन् परतीच्या प्रवासात कोंडी! आनेवाडी टोलवर ५ किमी वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT