फोटो ः आदर्श जैन
शशी पाटील संघाची ब्रिलियंट अकादमीवर मात
पुणे, ता. ७ ः पुणे क्रिकेट अकादमी आणि सागर कांबळे यांच्या वतीने आयोजित आठव्या अभिषेक ठाकूर स्मृती करंडक’ खुल्या गटाच्या टी-२० साखळी क्रिकेट स्पर्धेत आदर्श जैनने केलेल्या (६१) अर्धशतकी खेळीच्या जोरावर शशी पाटील संघाने ब्रिलियंट अकादमीचा ३१ धावांनी पराभव केला.
येवलेवाडी येथील ब्रिलियंट स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना शशी पाटील संघाने सहा बाद १६८ धावा केल्या यावेळी आदर्श जैनने ३३ चेंडूत पाच चौकार व चार षटकारासह ६१ धावांची केलेली खेळी उपयुक्त ठरली. सिध्देश भोसलेने दोन गडी बाद केले. प्रत्यूत्तर देताना ब्रिलियंट अकादमीला ८ बाद १३७ धावा करता आल्या यावेळी ओम जाधव आणि अथर्व पवारने केलेली खेळी अपुरी ठरली. देवृत्त खोसे, आतिश गावडे आणि तनय कुमारने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ब्रिलियंट अकादमीचे नितीन सामल, स्पर्धा संचालक सागर कांबळे, नरेंद्र ठाकूर, विकाससिंग, आकाश सुरवसे, शामजी पांडे हे उपस्थित होते. ‘सामनावीर’ हा मान आदर्श जैनने पटकाविला.
संक्षिप्त धावफलक ः
शशी पाटील इलेव्हन - (२० षटकांत) ६ बाद १६८ (आदर्श जैन ६१, सागर बिरादवाड २६, अनिकेत पातारे २२, सिध्देश भोसले २-३७) विजयी विरूद्ध ब्रिलियंट क्रिकेट अकादमी - (२० षटकांत) ८ बाद १३७ (ओम जाधव नाबाद ३५, अथर्व पवार ३३, देवृत्त खोसे २-१८, आतिश गावडे २-२४, तनय कुमार २-३५).
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.