PTK26B01117
फोटोओळ :
वाडी कुरोली : येथे झालेल्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलेला शेवते येथील आदर्श प्रशालेचा संघ मार्गदर्शकांसह.
आदर्श शेवते संघ खो-खोमध्ये जिल्ह्यात अव्वल
लक्ष्मीनगर संघावर एक डाव सात गुणांनी मात; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
पटवर्धन कुरोली, ता. २९ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने वाडी कुरोली (ता. पंढरपूर) येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत शेवते येथील आदर्श प्रशालेच्या संघाने अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात सांगोल्यातील लक्ष्मीनगर संघाचा एक डाव सात गुणांनी पराभव करून संघाने पुणे विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
अंतिम सामन्यात वेदांत भोसले, किरण मोरे आणि स्वप्नील गुंड यांनी पहिल्या डावात चार मिनिटे संरक्षण केले. सार्थक कोळी याने संरक्षण आणि आक्रमणात अष्टपैलू खेळ केला. लक्ष्मीनगर संघाचे १५ गडी बाद झाल्यानंतर शेवतेच्या संघाचे तीन गडी बाद झाले. अशा प्रकारे सात गड्यांच्या फरकाने शेवतेच्या संघाने विजय मिळवला.
या संघाला शंकर तोंडले, रणजीत तोंडले आणि विकास ढोणे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे मुख्याध्यापक मारुती तोंडले यांच्यासह रवी जाधव, भाऊ कोळी, परमेश्वर तोंडले, विनायक तोंडले, संपत सुतार, ज्ञानेश्वर राजमाने आणि सतीश बाबर यांनी अभिनंदन केले. स्पर्धेसाठी पंच म्हणून कलकमकर व आडगळे यांनी काम पाहिले. सरपंच मोहन रजपूत उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.