पिंपरी - अंमली पदार्थविरोधी पथकाचे मासुळकर कॉलनीतील कार्यालय. 
पुणे

गर्दुल्यांवर आता बारिक लक्ष

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - भोसरी-नाशिक मार्गावरील अमली पदार्थविरोधी पथक कार्यालयाचे मासुळकर कॉलनीलगतच्या भाजी मंडई आवारात स्थलांतर झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. २६ जानेवारीला कार्यालयाचे उद्‌घाटन होणार आहे. 

पोलिस आयुक्त कार्यालयाअंतर्गत हे कार्यालय सुरू करण्यात आले असून, या पथकामार्फत परिसरात दारूडे, गर्दुल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या परिसरातील टेल्को उद्यानात काही तरुण दारूचा अड्डा जमविताना पाहायला मिळत होते. तर, मंडईच्या आवारात जुगार खेळत असे. अशा गर्दुल्या आणि दारूड्यांचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पथकामुळे स्वाभाविकच गर्दुल्यांवर अंकुश बसेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पूर्वीच्या कार्यालयात अपुरी जागा होती. नागरिकांना बसण्याची सोय नव्हती. या नवीन कार्यालयात १६ कर्मचारी असतील. त्यात एक पोलिस निरीक्षक आणि दोन उपनिरीक्षकांचा समावेश असेल. सध्या कार्यालयात फर्निचरचे काम सुरू असून, टेबल व मुबलक खुर्च्यांची सोय करण्यात आली आहे.

परिसराबरोबर शहरातील कुठल्याही कोपऱ्यातून ‘कॉल’ आल्यास तातडीने कारवाई करण्यात येईल.
- श्रीराम पोळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अमली पदार्थविरोधी पथक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike : दूध महागणार! १ सप्टेंबरपासून प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ; नवा दर किती?

Devdutta Padikkal Tattoo: बाबो! जर्सीचा नंबर अन् नाव थेट पाठीवर! पडिक्कलच्या टॅटू पाहून चाहतेही चक्रावले, म्हणाले, ‘ अरे हे काय!’

Animal Feed Poisoning: पशुखाद्यातून विषबाधा; गोणेवाडीत दोन जनावरे दगावली, दोन गंभीर; पशुपालकाला मोठा आर्थिक फटका

Marathi News Live Updates : रक्षाबंधनानिमित्त रामदास आठवलेंची कामाठीपुराला भेट; महिलांनी बांधली राखी

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात माणुसकीला लाज आणणारी घटना! मृत महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने चोरले; VIDEO VIRAL होताच संतापाची लाट

SCROLL FOR NEXT