shital-ugale.jpg 
पुणे

अतिरिक्त आयुक्त शितल उगले यांची बदली

सकाळवृत्तसेवा

पुणे : महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त शितल उगले-तेली यांची आज बदली करण्यात आली असून त्याबाबतचा आदेशही निघाला आहे. उगले यांच्या बदलीसाठी सत्ताधारी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी  मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला होता. त्यातून उगले यांची बदली झाल्याची चर्चा आहे. याआधी प्रेरणा देशभ्रतार यांचीही मुदतीपुर्वीच बदली करण्यात आली होती. उगले यांच्याजागी रुबल अग्रवाल यांची नियुक्ती होणार आहे.  

शितल उगले यांची बदली नागपूर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. नागपूर शहराच्या विकासासाठी 1936 साली हे प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. या शिवाय, उगले यांच्याकड सदस्य सचिव वैधानिक विकास महामंडळ या पदाचा अतिरिक्त पदभारही असणार आहे. महापालिका आयुक्तांची मान्यता घेऊन या दोन्ही पदांचा तातडीनं पदभार घ्यावा असे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) डॉ. सिताराम कुंटे यांनी महापालिकेस पाठविलेल्या पत्रात देण्यात आले आहेत. 

महापालिकेत अतिरिक्‍त आयुक्तपदी उगले यांची 11 मे 2017 ला नियुक्त झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी प्रशासकीय शिस्त, बढती, तसेच निविदां प्रक्रियेतील गोंधळाला चाप लावला होता. त्यावरून सत्ताधारी भाजप पदाधिकारी आणि उगले यांच्यात वादाचे खटके उडत होते. अनेकदा त्याचे पडसाद मुख्यसभेतही उमटले होते. उगले यांनी आपल्या 19 महिन्यांच्या कारकिर्दीत शिक्षण मंडळ तसेच पालिका कर्मचारी आणि समाज विकास योजनांचा लाभ थेट डीबीटी द्वारे देणे, शाळांच्या सुधारणांसाठी “बाला’ प्रकल्प, प्रकल्पांचा नियमित आढावा घेण्यासाठी प्रत्येक बुधवारी वॉर रूमची बैठक असे उपक्रम राबविले होते. तर, शहरातील स्वच्छतागृहे पाडण्याच्या प्रस्तावांना त्यांनी मनाई केल्याने महिला आणि बालकल्याण समिती मधील सदस्यांशी त्यांचे वादही झालेले होते. त्याचे पडसद अनेकदा महापालिकेच्या मुख्यसभेत उमटून नगरसेवकांनी थेट उगले यांना शासनाकडे पाठविण्याची मागणीही केली होती. त्यानंतर भाजपच्या सुमारे 80 हून नगरसेवकांनी त्यांच्या बदलीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवून बदलीची मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT