Suhas-Chavan
Suhas-Chavan 
पुणे

अतिरिक्त सचिवांचा अपघातात मृत्यू

सकाळवृत्तसेवा

पुणे - मंत्रालयातील अतिरिक्त सचिव सुहास चव्हाण (वय ४९, रा. चेंबूर, मुंबई) यांचा हडपसरजवळील मंतरवाडी चौकात रविवारी रात्री आठच्या सुमारास झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ते दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण हे कात्रजवरून मंतरवाडीच्या दिशेने मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी समोरून आलेल्या खासगी बसने त्यांना धडक दिली. त्यात चव्हाण हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चव्हाण यांना १०८ या आपत्कालीन वैद्यकीय रुग्णवाहिकेतून उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. पण, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्‍टरांनी पोलिसांना दिली. चव्हाण यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT