Adhalarao Patil sakal
पुणे

Loksabha Elections : शिरूरच्या उमेदवारीसाठी अजूनही शर्यतीत : आढळराव, ‘म्हाडा’च्या अध्यक्षपदाचा स्वीकार

‘‘शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवारीबाबतचा निर्णय हे महायुतीतील तीनही प्रमुख घटक पक्षांचे नेते चर्चा करून घेतील. गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता, त्याच पक्षाच्या व्यक्तीला महायुतीची उमेदवारी मिळेल.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवारीबाबतचा निर्णय हे महायुतीतील तीनही प्रमुख घटक पक्षांचे नेते चर्चा करून घेतील. गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता, त्याच पक्षाच्या व्यक्तीला महायुतीची उमेदवारी मिळेल. आज मी ‘म्हाडा’चे अध्यक्षपद स्वीकारले आहे. आपल्या सर्वांना वाटते की माझा लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीची पत्ता कट झाला की काय? पण प्रत्यक्षात तसे काही नाही,’’ असे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि ‘म्हाडा’चे नवनियुक्त अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गुरुवारी (ता.२२) येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

राज्य सरकारने नुकतीच आढळराव पाटील यांची ‘म्हाडा’च्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर त्यांनी आज ‘म्हाडा’च्या अध्यक्षांचा पदभार स्वीकारला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे आदी उपस्थित होते.

आढळराव पाटील म्हणाले, ‘‘येत्या लोकसभा निवडणुकीसाठी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीचा महायुतीचा उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे चर्चा करून निश्‍चित करणार आहेत. मी कधीही खासदारकीच्या उमेदवारीसाठी काम करत नाही. मला शिरूर लोकसभेची महायुतीची उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल, पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचनेनुसार लोकसभा निवडणुकीचे काम करणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: नुकसानग्रस्तांना मदत करण्याची सरकारची भूमिका - अमित शाह

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

जेवण नाही, राहायची सोय नाही...सिंधुताईंच्या नावावर पैसे कमावणाऱ्या निर्मात्याने कित्येकांचे पैसे बुडवले; अभिनेत्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT