पुणे

आदिला नदी

CD

PNE26W29870
सोलापूर : जलसंपदामंत्री राधाकृषण विखे-पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख आदी.

१०० वर्षांपासून नाल्याचे रेखांकन; मग तो नदी कसा?
आमदारांचा बैठकीत सवाल; तांत्रिक बाबी तपासून निर्णय घेणार : विखे-पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २५ : जलसंपदा विभागाच्या पत्रव्यवहारात तसेच महापालिकेच्या आतापर्यंतच्या सर्व विकास आराखड्यांमध्ये ‘आदिला नाला’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. त्याच आधारावर महापालिकेने विकासकांना अंतिम लेआऊट मंजूर केले आणि नागरिकांना बांधकाम परवानग्याही दिल्या. मात्र, तब्बल शंभर वर्षांनंतर या नाल्याचे रेखांकन ‘आदिला नदी’ म्हणून करण्यात येत असल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवण्याची भीती व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत आमदार आणि संघर्ष समितीच्या सदस्यांनी आपली बाजू मांडली. त्यावर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तांत्रिक बाबींची सखोल तपासणी करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
आदिला नदीच्या रेखांकनासंदर्भात मुंबई येथे जलसंपदामंत्री विखे-पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आमदार देवेंद्र कोठे सहभागी झाले होते. यावेळी आदिला नाला आणि नदी याविषयी निर्माण झालेला गोंधळ, नागरिकांमधील संभ्रम, महापालिका प्रशासनाची भूमिका तसेच गेल्या शतकभरापासून विकास आराखड्यांमध्ये असलेला ‘आदिला नाला’ हा उल्लेख यावर सविस्तर चर्चा झाली.
महापालिकेने दिलेल्या बांधकाम परवानग्यांनुसार अनेक बांधकामे उभी राहिली आहेत. आता त्याच क्षेत्राचे नदी म्हणून रेखांकन झाल्यास सुमारे एक हजार बांधकामांवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता आमदारांनी व्यक्त केली. यावेळी अधिकाऱ्यांनी नदीच्या पूरस्थितीबाबतची माहिती सादर केली. मात्र, शंभर वर्षांपासून नाल्याचे रेखांकन असलेला प्रवाह अचानक नदी म्हणून कसा घोषित करण्यात आला, हा प्रश्न बैठकीत केंद्रस्थानी राहिला.
सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर मंत्री विखे-पाटील यांनी संबंधित तांत्रिक बाबींची तपासणी करून योग्य निर्णय घेतला जाईल, असा सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT