पुणे

कराडच्या कन्येचा भारतीय नौदलात

CD

कऱ्हाडमधील आदितीला
नौदलात नेतृत्वाचा बहुमान

उपराष्ट्रपतींच्या मानवंदना पथकाचे नेतृत्व; कारवारमध्ये सोहळा

सकाळ वृत्तसेवा
कऱ्हाड, ता. २५ : भारतीय नौदलात आपल्या नेतृत्वगुणांची छाप उमटवत येथील कन्येने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. सैदापूरमधील रेणुकानगर (ता. कऱ्हाड) येथील लेफ्टनंट आदिती ढिगारे यांनी कर्नाटकातील कारवार नौदल तळावर झालेल्या ‘आयएनएस समर्थक’ जहाजाच्या कमिशनिंग सोहळ्यात उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांना देण्यात आलेल्या औपचारिक मानवंदना पथकाचे नेतृत्व करण्याचा बहुमान मिळवला.
भारतीय नौदलाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या सोहळ्यात आदिती यांनी शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्व कौशल्याचे दर्शन घडवले. देशाच्या उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत आयोजित प्रतिष्ठेच्या कार्यक्रमात मानवंदना पथकाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली होती. ही जबाबदारी समर्थपणे पार पाडत त्यांनी कर्तृत्वाची झलक दाखवली.
सैन्य दलातील अधिकारी म्हणून देशसेवेचे व्रत स्वीकारलेल्या आदिती यांनी मिळवलेला हा बहुमान त्यांच्या वैयक्तिक यशापुरता मर्यादित नाही. कऱ्हाडसह जिल्ह्यासाठीही ही अभिमानाची बाब ठरली आहे. भारतीय सशस्त्र दलांत महिला अधिकारी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत नेतृत्वाचा नवा आदर्श निर्माण करीत आहेत. आदिती यांची कामगिरी त्याचेच प्रत्यंतर देणारी आहे.

...............

चौकट
...............

जिद्द, शिस्त अन् नेतृत्व

भारतीय नौदलातील महत्त्वपूर्ण सोहळ्यात नेतृत्वाची संधी मिळवत आदितीने आपल्या गावासह जिल्ह्याचे नाव उंचावले. कठोर प्रशिक्षण, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर प्रतिष्ठेच्या जबाबदाऱ्या पार पाडता येतात, हा संदेश त्यांच्या कामगिरीतून मिळत आहे. त्यांच्या या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.


W61468
आदिती ढिगारे

W61467
कारवार (कर्नाटक) ः उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांना मानवंदना देताना आदिती ढिगारे.
.....................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीशांच्या १७ वर्षांच्या लेकानं मर्सिडीज चालवत दुचाकीला दिली धडक, एकाचा मृत्यू

‘आम्ही हिंदू आहोत, आमच्याकडे घटस्फोट होत नाही' कोमल रानी स्वर्णकारसोबत अफेअरवर गोविंदांने अखेर सोडलं मौन; म्हणाला...

Food Poisoning: महाप्रसादातून विषबाधा, गर्भवतीने बाळाला जन्म दिला पण दीड दिवसातच चिमुकल्याचा मृत्यू

Latest Marathi News Update : खालसा फायनान्स कंपनीच्या तिघांना घेतलं ताब्यात

Ichalkaranji Crime : पहाटे भांडले, पत्नीने झोपेच सोंग घेत पतीचा काटा काढला अन्; झोपून सकाळी मुलीसोबत पोलिस स्टेशन गाठलं, इचलकरंजीत धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT