साताऱ्याच्या आदित्यची
ठाण्याच्या मनीषवर मात
सातारा, ता. २ : येथे आज झालेल्या श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले स्मृती करंडक व नंदू नाटेकर स्मृती करंडक आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेतील वैयक्तिक प्रकारात साताऱ्याच्या आदित्य खामकरने ठाण्याच्या मनीष गिलवर विजय मिळविला. अन्य सामन्यात साताऱ्याच्या खेळाडूंना प्रतिस्पर्धींकडून पराभव स्वीकारावा लागला.
ही स्पर्धा छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात घेण्यात येत आहे. स्पर्धेतील एकेरीत साताऱ्याच्या श्रीयांस फणसाळकर याच्यावर पुण्याच्या असीम श्रोत्रिय याने १५-१३, १५-३ असा विजय मिळविला. सोलापूरच्या राजवर्धन वळसंगकर याने साताऱ्याच्या शामराव गोराडचा १५-५ १५-४, पुण्याच्या सार्थक पाटणकरने साताऱ्याच्या सत्यजित जगधने याचा १६-१४ १५-५, पुण्याच्या अवधूत कदमने साताऱ्याच्या हर्षद सदावर्तेचा १५-६ १५-७ असा पराभव केला.
अन्य सामन्यांचा निकाल असा ः
दिग्विजयसिंग राजपूत (पुणे). वि.वि. दीपांशु शुक्ला (नागपूर) १६-१४, १५-११, देवेश जाधव (पुणे) वि.वि. सस्मित आर्य (बृहन्मुंबई) १५-३, १५-१२, तनय मेहेंदळे (रायगड) वि.वि. खगेश मराठे (नंदुरबार) १५-४ १५-५, साकेत औटी (पुणे) वि.वि. अथर्व उमरतकर (यवतमाळ) १५-५, १५-५, रुद्र उमरानिया (कोल्हापूर) वि.वि. अनिर्बन भट्टाचार्जी, (रायगड) ९-१५, १५-५, १५-६, कृष्णा जासुजा (पुणे) वि.वि. राज शितोळे (धाराशिव) ९-१५, १५-८, १५-८, मानस ठाकरे (नाशिक) वि.वि. प्रेम वर्मा (चंद्रपूर) १३-१५, १५-९, १५-११.
फोटो :........ PNE26W54659
सातारा ः आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेतील क्षण. (प्रमोद इंगळे : सकाळ छायाचित्रसेवा)
.......................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.