Aditya Thackeray Sakal
पुणे

छत्रपतींच्या जन्मदिवशी तिरंगा फडकविण्याचा अभिमान- आदित्य ठाकरे

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून येरवडा येथील डॉ. चिमा उद्यान येथे उभारण्यात आलेल्या ४५ मीटर तिरंगा ध्वज स्तंभाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रशांत पाटील

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून येरवडा येथील डॉ. चिमा उद्यान येथे उभारण्यात आलेल्या ४५ मीटर तिरंगा ध्वज स्तंभाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

विश्रांतवाडी - देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा करत असतांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जन्मदिनी (Shiv Jayanti) देशाचा तिरंगा (Tiranga Flag) फडकविण्याचा (Fly) मान मिळाला याचा अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केले.

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून येरवडा येथील डॉ. चिमा उद्यान येथे उभारण्यात आलेल्या ४५ मीटर तिरंगा ध्वज स्तंभाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यादरम्यान ठाकरे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी पक्षाचे संपर्कप्रमुख सचिन आहिर, विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आदित्य शिरोडकर, शहरप्रमुख संजय मोरे, पृथ्वीराज सुतार, पालिका गटनेते संजय भोसले, नगरसेविका श्वेता चव्हाण, अविनाश साळवे, अमृत पठारे, वडगाव शेरी विधानसभा मतदारा संघाचे विभागप्रमुख सोमनाथ खांदवे, आनंद गोयल, माजी नगरसेवक सचिन भगत, शंकर चव्हाण आदी शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते. ठाकरे पुढे म्हणाले की, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी देशाचा तिरंगा फडकवणे म्हणजे हा योगायोग आहे. त्यातच मतदान हे शस्त्र असून देशाची लोकशाही अबाधित राखण्यासाठी समाजातील मतदारांनी मतदान करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे मतदारराजांनी आपले मतदान व्यर्थ जाऊ देऊ नका. याबरोबरच लोकशाही टिकविण्यासाठी समाजातील मतदारांपर्यंत जाऊन त्यांच्यात मतदानाविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे.

यावेळी नारायण राणे व किरीट सोमय्या यांच्याविषयी ते म्हणाले की, हे किरीट सोमय्या व नारायण राणे ठाकरे कुटुंबियांना व मातोश्रीला लक्ष केंद्रित करत असून मीडियाने देखील त्यांच्याकडे किती लक्ष द्यावे हे मीडियानेच ठरवावे असे ठाकरे यांनी सांगितले. यादरम्यान मावळ व मुळशी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन हाती बांधले. तर रणरणत्या उन्हात ही शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. तर परिसरात भगवे झेंडे फडकविण्यात आल्याने व शिवसैनिक महिलांनी भगव्या साड्या परिधान केल्याने परिसर भगवेमय झाले होते. यावेळी जय शिवाजी,जय भवानीच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमला होता. त्यामुळे परिसर भगवेमय झाला होता. तर परिसरात काहीही अनुचित घटना घडू नये. याकरिता कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी ठाकरे यांना पाहण्यासाठी शिवसैनिकांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक संजय भोसले यांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार, गैर काय? उपमहापौरांनी स्पष्ट केली भूमिका

Ujjain Temple: उज्जैनमध्ये आज 'चमत्कार'! पहाटे होणारी भस्म आरती आज दुपारी; वर्षातून फक्त एकदाच मिळते अशी संधी, पाहा काय आहे कारण

लाइफ बना दूँगा! रिलस्टार बनवण्याचं आमिष, १५ वर्षीय मुलीवर युट्यूबरचा लेकासह अत्याचार; दोघांना अटक

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

SCROLL FOR NEXT