पुणे

नगर : बाळहिरड्यासाठीच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

CD

बाळहिरड्याच्या हमीभावासाठी
शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
----
ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : राज्य सरकारकडून हमीभाव जाहीर न झाल्याने व्यापारी केवळ १०० रुपये किलो दराने बाळ हिरडा खरेदी करत आहेत. त्यामुळे आदिवासी शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने तातडीने हमी भावाने खरेदी सुरू करावी; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी बांधवांनी आदिवासी विकास महामंडळाला दिलेल्या निवेदनात दिला आहे.
डोंगर माथ्यावर व दुर्गम भागात असलेल्या झाडांवर चढून बाळहिरडा गोळा करणे धोकादायक काम मानले जाते. हे काम करताना अनेकांचा बळी गेला आहे, तर काहींना अपंगत्व आले आहे. मात्र, आदिवासी कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी बाळहिरडाच मुख्य आर्थिक आधार ठरत आहे. मुलांचे शिक्षण, आरोग्य, शेतीसाठी बी-बियाणे, खते, तसेच घरखर्च या माध्यमातून भागवला जातो.
सामाजिक कार्यकर्ते अनंत महादू घाणे यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी आंदोलनानंतर शासनाने १७० रुपये प्रतिकिलो हमीभाव जाहीर करून खरेदी केली होती. मात्र, नंतर खरेदी बंद करण्यात आली. यंदा आदिवासी विकास महामंडळामार्फत ३०० ते ३५० रुपये दराने खरेदी करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु निर्णय होण्यापूर्वीच व्यापारी शेतकऱ्यांकडून केवळ १०० रुपये दराने माल खरेदी करत असून, आदिवासींची आर्थिक लूट सुरू आहे. ती न थांबल्यास आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT