hand 
पुणे

आळंदीकर देतायेत म्हणून कितीवेळा घेणार? 

विलास काटे

आळंदी (पुणे) : गरीब आणि मजुरांना स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि महसूल प्रशासनाकडून वारंवार धान्याचे कीट वाटण्यात आले. तरीही काही लोक वारंवार आम्ही अन्नधान्यापासून वंचित असल्याची मोबाईलवरून तक्रार करत आहे. असल्याने आता आणखी काय द्यायचं, या विचाराने आळंदीत लोकप्रतिनिधी, महसूल आणि पालिका प्रशासन हतबल झाले तब्बल तीन वेळा धान्याचे किट घेऊनही काही लोक पुन्हा मागणी करत आहेत. 

लॉकडाउनमुळे कोणीही उपाशी राहू नये, यासाठी तीन महिन्यांचे गहू आणि तांदूळ शासनाकडून वाटप झाले. रेशन दुकानदारांनीही इमानदारीत धान्य वाटप केले. बिगर रेशन कार्डधारक आणि स्थलांतरितांनाही धान्याचे किट मोफत वाटले. याचबरोबर स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि महसूल प्रशासन यांनी त्यांच्या स्तरावर धान्य गोळा करून वाटप करत आहे.

किराणा वस्तूंचे किट किमान चार माणसांच्या कुटुंबाला 3 आठवडे पुरेल, असे वाटले. याचबरोबर कांदे, बटाटे, फ्लॉवरही वाटले. आळंदीत अडीच हजारांहून अधिक कुटुंबीयांना लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि प्रशासनाने वाटप केले. तसेच, दररोज शिजवलेल्या अन्नाचे पाकीट दोन वेळा वाटले जाते. मात्र, काही लोक धान्याचे किट घेऊनही समाधानी नसल्याचे चित्र आहे. 
वारकरी संप्रदायातील मंडळीही किटसाठी गावाकडच्या आमदार, खासदार, विभागीय आयुक्तांना सोशल मीडियावरून यादी पाठवितात. त्यानंतर यादी स्थानिक जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे येते आणि तुम्ही यांची व्यवस्था करा, असे सांगितले जाते.

नाइलाजास्तव वरिष्ठांकडून आलेल्या यादीला प्राधान्य देत पुन्हा किटचे वाटप केले जाते. अनेकजणांना दोनदा, तीनदा मदत पोचली, तरीही त्यांची भूक भागेना, असे चित्र आहे. आम्ही बेरोजगार गरजवंत असून धान्याची गरज असल्याची तक्रारी केल्या जात आहे. आर्थिकदृष्ट्या लोकांकडूनही मागणी होत आहे, यामुळे लोकप्रतिनिधी, महसूल आणि प्रशासन हतबल झाले आहे. 

सर्वेक्षण केल्यास खऱ्या गरजूंना मदत 
संचारबंदीत आळंदीतून किती लोक गावी गेले आणि बाहेरून परतले, याची नोंद प्रशासनाकडे नाही. तसेच, एकूण घरे आणि त्यामध्ये राहणाऱ्या भाडेकरू कुटुंबांची आकडेवारी पालिकेकडे नाही. त्यामुळे पुन्हा त्याच लोकांना मदत होते आणि खरा गरजवंत मागेच राहत असल्याचे चित्र आहे. घरोघरी सर्वेक्षण केले; तर खऱ्या गरजूंपर्यंत मदत पोहोचू शकते. 

तलाठी कार्यालयात अकराशे आणि पालिकेत नोंद केलेल्या तीन हजार, असे सुमारे चार हजार एकशे लोकांनी धान्य वाटपाची मागणी केली आहे. पालिकेने धान्य बॅंक सुरू केली असून, लोक मदत करत आहेत. महसूल खात्याच्या वतीने सार्वजनिक संस्थांच्या मदतीने आळंदीत सामूहिक उपाहारगृह सुरू केले जाणार असून, त्यामार्फत शिजवलेले अन्न गरजूंना दिले जाणार आहे. 
- समीर भूमकर
मुख्याधिकारी, आळंदी (ता. खेड) नगरपालिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT