saurabh-rao sakal
पुणे

Pune News : प्रशासकीय गतिमानता अभियानाची पुणे विभागात आजपासून स्पर्धा

पुणे विभागाच्या प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या अभियानाची यंदाची स्पर्धा येत्या रविवारपासून (ता. २०) आयोजित करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे विभागाच्या प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानाची यंदाची स्पर्धा येत्या रविवारपासून (ता.२०) आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत पुणे विभागातील सर्व सरकारी कार्यालयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीपासून दरवर्षी ही स्पर्धा सुरु होत असते. यानुसार येत्या रविवारी (ता.२०) राजीव गांधी यांची जयंती आहे. यानुसार येत्या रविवारी सुरु होणारी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानाच्या स्पर्धेचा कृती हा कालावधी हा महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनापर्यंत (ता.२ आक्टोबर) असणार आहे. मात्र सन २०२३-२४ या वर्षाच्या स्पर्धेसाठी २० ऑगस्ट २०२२ ते १० ऑगस्ट २०२३ हा कालावधी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

या स्पर्धेत कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना व व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब, सेवांची गुणवत्ता वाढ व उपक्रमांची परिणामकारकता, लोकाभिमुखता, ई-गव्हर्नन्स , संसाधनांचा पर्याप्त व प्रभावी वापर, तंटा, तक्रार मुक्त कार्यालय आणि नावीन्यपूर्ण व पथदर्शी स्वरूपाच्या संकल्पना आदी बाबींचा पारितोषिक निवडीसाठी विचार केला जाणार असल्याचे राव यांनी सांगितले.

दरम्यान, विभागात या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर तर, तालुक्याच्या ठिकाणी प्रांताधिकारी व तहसीलदारांनी आपापल्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व गटविकास अधिकारी यांची बैठक घेण्याचा आदेश राव यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Rajapur Tragedy : नाणारमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेली एकाच घरातील ४ भावंडे बुडाली; तिघांचे मृतदेह हाती

SCROLL FOR NEXT