Pubs sakal
पुणे

Pune News : प्रशासकीय यंत्रणा सुस्त; पब, बारवरील कारवाई का थंडावली?

कल्याणीनगर अपघातानंतर महापालिका आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरुवातीला अनधिकृत पब, बारवर कारवाईचा धडाका लावला. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून हा धडाका थंडावल्याचे चित्र आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कल्याणीनगर अपघातानंतर महापालिका आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरुवातीला अनधिकृत पब, बारवर कारवाईचा धडाका लावला. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून हा धडाका थंडावल्याचे चित्र आहे. त्यामुळे ‘कारवाई थंडावली का’ अशी चर्चा सध्या नागरिकांत सुरू झाली आहे. प्रशासनाच्या कारवाईच्या आकडेवारीवरूनही हे चित्र स्पष्ट होत आहे.

महापालिकेच्या बांधकाम विभागाने गेल्या सहा दिवसांत ५५ अनधिकृत बार, पबवर कारवाई करून १ लाख ७ हजार हजार चौरस फुटाचे बांधकाम पाडण्यात आले. शहरात अद्यापही अनेक अनधिकृत रुफटॉप हॉटेल, बार असून, राजकीय पदाधिकाऱ्यांचा आश्रय असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ का केली जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अनेक ठिकाणी रहिवासी भागात रेस्टॉरंट, बार, पब सुरू झाल्याने तेथील रहिवाशांना गोंधळ आणि पार्किंगच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पण तक्रारी करूनही महापालिकेकडून कारवाई केली जात नव्हती. कल्याणीनगर येथील पोर्शे कारच्या अपघातामध्ये दोघांचा बळी घेतला. यातील अल्पवयीन आरोपीने पबमध्ये दारू पिल्याचे उघडकीस आल्याने संपूर्ण शहरात पब, बारमध्ये होणारे नियमांचे उल्लंघन, अनधिकृत बांधकामे याकडे महापलिका, पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष गेल्याने आता कारवाई सुरू झाली आहे.

पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरात २२ मे पासून अनधिकृत बार, पब, रेस्टॉरंटवर कारवाई सुरू केली आहे. सुरुवातीला कारवाईचा जोर चांगला होता, पण आता कारवाई संथ झाली आहे. कोथरूड, बाणेर, बालेवाडी, कोंढवा, महंमदवाडी, हडपसर या भागांत अनेक अनधिकृत बार, पब आहेत. यामध्ये आमदार, माजी आमदार, माजी नगरसेवकांसह अन्य पदाधिकाऱ्यांची भागीदारी आहे.

हे बार अनधिकृत असल्याचे माहिती असूनही अजून कारवाई झालेली नाही. आत्तापर्यंत २२ ते २९ मे या दरम्यान झालेल्या कारवाईत ७७ हॉटेलवर कारवाई करून १ लाख ७ हजार २९९ चौरस फुटांचे बांधकाम पाडले आहे. त्यामध्ये ५५ रेस्टॉरंट, बार आणि पबचा समावेश आहे. उर्वरित ठिकाणी छोटे हॉटेल खानावळ यांचे फ्रंट मार्जिन, साइड मार्जिनमधील अतिक्रमण आहे.

कारवाई टाळण्यासाठी हॉटेल बंद

कल्याणीनगर येथील घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियमांचे उल्लंघन करणारे पब, बार सील करण्यात आले आहेत. महापालिकेनेही अनधिकृत बांधकाम पाडून हॉटेल बंद पाडले आहेत. पण ही कारवाई पुढचे एक-दोन आठवडे सुरू राहिली. तोपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याबाबत प्रशासनातून ‘टीप’ मिळाल्यानंतर सध्या बार, हॉटेल बंद ठेवण्यात आले आहेत. कल्याणीनगर प्रकरणाची चर्चा बंद झाल्यानंतर स्थिती पूर्ववत होईल त्यानंतर हॉटेल सुरू केले जातील, अशीही चर्चा सुरू आहे.

आतापर्यंत ६३ हॉटेलचे परवाने सील

कल्याणीनगर अपघातानंतर जाग आलेल्या प्रशासनाकडून कारवाईचा धडाका लावला आहे. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार या मोहिमेअंतर्गत नियमांचे पालन न करणाऱ्या मद्यालयांवर कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्याला डॉ. दिवसे यांनी मान्यता दिल्याने परवाना सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, ‘‘गेल्या आर्थिक वर्षात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १९ मद्यालयांवर कारवाईचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून प्राप्त झाला होता. त्यानुसार आदेश काढण्यात आले. तसेच चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ६३ मद्यालयांनी नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्यानुसार कारवाई करण्यात आली.

अशाप्रकारे गेल्या आणि चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ८२ मद्यालयांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आणखी काही प्रस्ताव असल्यास त्याची पडताळणी करून कारवाईचे आदेश काढण्यात येतील.’’

झोन १, २, ३ या भागांतील अनधिकृत बार, रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आलेली आहे. कारवाई केलेल्या ठिकाणांची यादी राज्य उत्पादन शुल्क विभागालाही दिली आहे. आणखी काही ठिकाणे राहिली असतील तर त्यावरही कारवाई केली जाणार आहे.

- श्रीधर येवलेकर, अधीक्षक अभियंता

बांधकाम विभागाने जुन्या हद्दीतील झोन ४, ५, ६मध्ये कारवाई केली आहे. जवळपास ७० ते ८० टक्के अनधिकृत बार, रेस्टॉरंटवर कारवाई केली आहे. कारवाईचा जोर कमी झालेला नाही. शेड काढल्यानंतर पुन्हा हॉटेल सुरू करण्याचा प्रयत्न केला तर कारवाई केली जात आहे.

- राजेश बनकर, अधीक्षक अभियंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT