Administrator at Pune high school accused of sexual harassment against female staff Sakal
पुणे

Pune: शाळेच्या प्रशासकाकडून महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग

Pune: हायस्कूलमधील प्रशासकाने महिला कर्मचाऱ्याकडे शारीरिक सुखाची मागणी करून विनयभंग केल्याची घटना

सकाळ वृत्तसेवा

पुणे: कोरेगाव पार्क परिसरातील एका हायस्कूलमधील प्रशासकाने महिला कर्मचाऱ्याकडे शारीरिक सुखाची मागणी करून विनयभंग केल्याची घटना घडली. याच भागातील एका महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीवर चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार समोर आला आहे.

याबाबत एका ५१ वर्षीय महिलेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रशांत पुष्टी (वय ५२) या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुष्टी हा एका टेक्निकल हायस्कूलमध्ये प्रशासक आहे.

त्याने या हायस्कूलमधील महिला कर्मचाऱ्यास अश्लील भाषेत शेरेबाजी केली. महिलेशी लगट करून तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. तसेच, याबाबत कोणाला सांगितल्यास नोकरीवरून काढण्याची धमकी दिली, असे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी घटनास्थळी भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : युट्युबर ध्रुव राठी यांची सुटका

IND A vs AUS A: पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभव, आता व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान! ऑस्ट्रेलिया अने जिंकली नाणेफेक; भारत अ प्रथम फलंदाजीला

Ratnagiri ST Bank: चार्जिंग स्टेशनचा महागडा निर्णय ?;नफ्यातील बँक पाडून एसटीवर भाड्याचा बोजा

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT