Admission
Admission 
पुणे

‘बायफोकल’चे प्रवेश अवैध ठरणार?

संतोष शाळिग्राम

पुणे - अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता द्विलक्ष्यी (बायफोकल) अभ्यासक्रमाचे प्रवेश ऑफलाइन म्हणून अवैध ठरण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने हे प्रवेश ऑफलाइन केल्याचे कारण देत व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण विभागाने सुमारे शंभर शाळांमध्ये झालेल्या या प्रवेशाची मान्यता रोखून धरली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

अकरावीच्या नियमित प्रवेशाप्रमाणे ‘बायफोकल’चे प्रवेशही ऑनलाइन पद्धतीने करावेत, असा नियम आहे. मात्र, या वर्षी प्रवेश समितीने हे प्रवेश शून्य फेरीत करून घेतले. त्यानंतर नियमित प्रवेश फेऱ्यांना सुरवात झाली.

विज्ञान शाखेचे प्रवेश झाल्यानंतर संस्था स्तरावर पुन्हा ‘बायफोकल’चे प्रवेश करण्यात आले. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण विभागाने याला आक्षेप घेतला आहे. यापूर्वी ‘बायफोकल’चे प्रवेश प्रत्येक फेरीत घेतले जात होते. त्यामुळे ते ऑनलाइन होत होते. परंतु, या वर्षी शून्य फेरीत हे प्रवेश घेतले आणि नंतर विज्ञान शाखेच्या प्रवेशानंतर ऑफलाइन घेण्यात आले, असे या विभागाचे म्हणणे आहे.

केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने दरवर्षी ‘बायफोकल’चे प्रवेश केल्यानंतर त्याला व्यवसाय शिक्षण विभागाची मान्यता घ्यावी लागते. आता ‘बायफोकल’च्या प्रवेशाला या विभागाने मान्यता दिली नाही, तर ते प्रवेश अवैध ठरून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही, अशी चिंता कनिष्ठ महाविद्यालयांना लागून राहिली आहे. कनिष्ठ महाविद्यालये या प्रवेशांना परवानगी मिळावी, यासाठी व्यवसाय शिक्षण विभागाकडे हेलपाटे मारू लागली आहेत. 

याविषयी उपजिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी धीरज नेवसे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘‘केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने शून्य फेरीत ‘बायफोकल’ अभ्यासक्रमाचे ऑनलाइन प्रवेश केले. पण त्यात दहा टक्केच प्रवेश झाले. उर्वरित प्रवेश हे ऑफलाइन पद्धतीने करण्यात आले आहेत. त्यामुळे त्याची मान्यता रोखून धरली आहे. याबाबत समितीकडे स्पष्टीकरण मागविले आहे. अजूनही त्यांच्याकडून प्रतिसाद नाही. त्यानंतर मान्यता देण्याबाबत निर्णय घेऊ.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Constituency : नाराजी दूर करण्यासाठी भुजबळांच्या दारी महाजन; बंद दाराआड सव्वा तास चर्चा

Latest Marathi News Live Update : चीनमध्ये भूस्खलनात वाहून गेला हायवे; भीषण अपघातात सुमारे 19 ठार - रिपोर्ट

World Cupसाठी निवड झालेल्या 15 खेळाडूंची कशी आहे IPL मधील कामगिरी? उपकर्णधार पांड्या ठरतोय फ्लॉप

Shah Rukh Khan: "तो तर बॉलिवूडचा जावई, मी त्याला तेव्हापासून ओळखतोय, जेव्हा तो.."; किंग खानकडून किंग कोहलीवर कौतुकाचा वर्षाव

Gold ETF: ‘ईटीएफ’ देतेय ‘सोन्या’सारखी संधी; गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायामुळे चलती

SCROLL FOR NEXT