पुणे

बिबवेवाडीत तुपामध्ये भेसळीचा प्रकार उघड

सकाळवृत्तसेवा

पुणे- ऐन दिवाळीच्या तोंडावर तुपामध्ये भेसळ करण्यात येणाऱ्या गोडाऊनवर छापा घालून भारती विद्यापीठ पोलिसांनी तब्बल 412 किलो भेसळयुक्त तूपसाठा जप्त केला. बिबवेवाडीतील एका इमारतीमध्ये असलेल्या दुकानात हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून, केशरसिंग मानसिंग राठोड (वय 40, रा. अप्पर इंदिरानगर) असे त्याचे नाव आहे.

भारती विद्यापीठ पोलिसांना बुधवारी रात्री दुचाकीवरील एक व्यक्ती कात्रज चौकात भेसळयुक्त तूप घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून राठोड यास ताब्यात घेतले. त्याच्याकडील तुपात तेल व डालडा टाकून भेसळ केल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधून त्यांच्या सहकार्याने भेसळ होत असलेल्या बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील नोबेल एक्‍सलन्सी या इमारतीतील गोडाऊनवर छापा घातला. यात भेसळ केलेले गाईच्या तुपाचे 25 डबे जप्त केले.

या तुपाचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेकडे पाठविले असून, पोलीस निरीक्षक विष्णू पवार, गुन्हे पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, उमसे व तपास पथकातील चंद्रकांत फडतरे, कृष्णा बढे, सर्फराज देशमुख, सचिन पवार, गणेश चिंचकर, महेश मंडलिक, राहुल तांबे, कुंदन शिंदे, अभिजित रत्नपारखी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sayali Surve Gharwapsi : प्रेमासाठी बदलला धर्म! 10 वर्षात झाली 4 मुलं, पण नवऱ्यानं..; पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी, तिच्यासोबत सासरी असं काय घडलं?

Pune News: इराणच्या बंदरांवर कंटेनर अडकले! कृषिमाल निर्यातीवर युद्धाचा मोठा परिणाम; इराणी सफरचंद, किवीच्या दरात वाढ, शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना फटका..

'तुम्हाला माझ्या नवऱ्यासोबत दारु प्यायची का?' उषा नाडकर्णी स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...'तुम्हाला काय करायचं?'

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत काँग्रेसची पदयात्रा; शेतकरी, शेतमजूर आणि बेरोजगारीच्या प्रश्नांवर आंदोलन

पतीचे विवाहबाह्य संबंध, मानसिक त्रास अन् छळ; डॉक्टर मनीषा जेजूरकर यांच्या भावाचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT