Ujani Dam esakal
पुणे

Ujani Dam : उजनी धरण प्रशासनावर त्वरित कारवाई करा; 'ग्राहक संरक्षण'च्या सदस्यांची मुख्य सचिवांकडे मागणी

सन 2017 मध्येही बोट उलटून सहा डॉक्टरांचा दुर्देवी अंत झालेला होता.

मिलिंद संगई, बारामती

भंगारातून खरेदी केलेल्या बोटींचा (Boating) होणारा वापर, सुरक्षिततेसाठी लाईफ जॅकेट नसणे यासह परवानगी नसताना बोटिंग किंवा नौकाविहार करणे या बाबत बेकायदा आहेत.

बारामती : उजनी जलाशयामध्ये बोटिंग किंवा नौकाविहाराची परवानगी नसतानाही अनेक वर्षांपासून बेकायदा बोट चालविल्या जातात, ही बाब माहिती असूनही त्या विरुध्द कारवाई न केल्याबद्दल उजनी धरण (Ujani Dam) प्रशासनासह महसूल विभागाच्या अधिका-यांवर कारवाईची मागणी ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य अॅड. तुषार झेंडे पाटील यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.

भंगारातून खरेदी केलेल्या बोटींचा (Boating) होणारा वापर, सुरक्षिततेसाठी लाईफ जॅकेट नसणे यासह परवानगी नसताना बोटिंग किंवा नौकाविहार करणे या बाबत बेकायदा आहेत. या बाबी होत असल्याची माहिती असूनही उजनी धरण प्रशासन व महसूल विभागाने या रोखण्यासाठी काहीही केलेले नाही.

सन 2017 मध्येही बोट उलटून सहा डॉक्टरांचा दुर्देवी अंत झालेला होता. त्या नंतरही प्रशासनाला जाग आली नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुन्हा एकदा सहा जणांचा जीव गेल्याने या बाबत कारवाई व्हावी व मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून (CM Relief Fund) प्रत्येकी पाच लाखांची मदत व्हावी, अशी मागणी अॅड. झेंडे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT