दुष्काळी अग्रिम मदतीतून कर्जवसुली नको
जिल्हा प्रशासनाचे बँकांना निर्देश; शेतकऱ्यांना पाच हजारांची अग्रिम मदत
ॲग्रोवन वृत्तसेवा
नांदेड ः खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर प्रत्येकी ५ हजार रुपये अग्रिम मदत जमा करण्यात येणार आहे. या मदतीतून बँकांनी कोणत्याही प्रकारच्या कर्जाची वसुली किंवा कपात करू नये, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा आणि शेतीसह कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी मदत व्हावी, या उद्देशाने शासनाकडून अग्रिम मदत देण्यात येत आहे. या मदतीचा संपूर्ण लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करून बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणाऱ्या अग्रिम मदतीच्या रकमेतून कोणत्याही प्रकारची कर्जवसुली अथवा अन्य कपात करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील सर्व बँकांनी या निर्देशांची गांभीर्याने दखल घेऊन त्यांची अंमलबजावणी करावी. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून देण्यात येणारी अग्रिम मदत कोणत्याही कपातीशिवाय पात्र शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.