पुणे

औद्योगिक हायड्रॉलिक्सच्या प्रगत प्रशिक्षणाचे आयोजन

CD

पुणे, ता. २५ : औद्योगिक यंत्रसामग्रीतील हायड्रॉलिक सिस्टिमचे डिझाइन, कार्यप्रणाली आणि बिघाडांचे निदान यांचे प्रशिक्षण देणारा तीन दिवसीय ‘ॲडव्हान्स्ड इंडस्ट्रिअल हायड्रॉलिक्स’ अभ्यासक्रम एसआयआयएलसी आणि तोलानी मेरीटाइम इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने २८, २९ व ३० ऑक्टोबरला आयोजित केला आहे. प्रशिक्षणात फ्लुइड मेकॅनिक्स, पास्कल्स लॉ, हायड्रॉलिक पंप्स व ॲक्च्युएटर्स, ॲक्युम्युलेटर सर्किट्स आणि कार्ट्रिज लॉजिक यांचा अभ्यास केला जाईल. तसेच इलेक्ट्रो-हायड्रॉलिक रॅपिड ट्रॅव्हर्स, क्रिप स्पीड सर्किट्स आणि पीएलसी आधारित हायड्रॉलिक सर्किट्स यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्यक्ष उपकरणांवर काम करण्यासह सिस्टिम डिझाइन आणि दोषनिदानाचे तंत्र शिकवले जाईल. तंत्रज्ञ, इंजिनिअरिंग विद्यार्थी आणि औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. प्रशिक्षणाचे आयोजन इंदुरी, तळेगाव दाभाडे, पुणे येथे केले आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६

सेल्फ रिडेव्हलपमेंट कार्यशाळा
जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी स्वयंपुनर्विकास ही संकल्पना वेगाने पुढे येत असून त्याबाबत माहिती देणारी कार्यशाळा ३१ ऑक्टोबरला आयोजिली आहे. स्वयंपुनर्विकास म्हणजे सोसायटीने स्वतः पुढाकार घेऊन विकसक न नेमता पुनर्विकास करणे. या पद्धतीमुळे जुन्या सदनिकाधारकांना भाडे, कॉर्पस फंड, बेटरमेंट चार्जेस तसेच इतर खर्चाचा अधिक फायदा मिळू शकतो. कार्यशाळेत स्वयंपुनर्विकासाची प्रक्रिया, कागदपत्रे, सोसायटीचे ठराव, शासकीय नियम तसेच आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल अभियंता, कंत्राटदार व इतर सल्लागारांशी समन्वय कसा साधायचा, प्रकल्प सल्लागार कसा निवडावा, ठेकेदाराची निवड आणि दर्जेदार व वेळेत बांधकाम कसे सुनिश्चित करावे, याचीही माहिती दिली जाईल. इच्छुक सोसायट्यांना स्वयंपुनर्विकासासाठी खात्रीशीर प्रकल्प सल्लागार सेवा (सशुल्क) उपलब्ध करून दिली जाणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६

एक्सेल व एआयच्या मदतीने
डेटा अ‍ॅनालिसिस कार्यशाळा
व्यवसायातील निर्णय अधिक अचूक आणि परिणामकारक घेण्यासाठी डेटा विश्लेषणाचे कौशल्य विकसित करणारी प्रात्यक्षिक कार्यशाळा ३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबरला आयोजिली आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि एआयच्या साहाय्याने डेटा स्वच्छ करणे, त्याचे विश्लेषण करणे, आलेख व अहवाल तयार करणे आणि त्यातून उपयुक्त निष्कर्ष काढण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. कार्यशाळेत डेटा अ‍ॅनालिसिसची मूलभूत माहिती, डेटा क्लीनिंग, एक्सेलमधील महत्त्वाची सूत्रे व फंक्शन्स, सॉर्टिंग, फिल्टरिंग, फॉरमॅटिंग तसेच पिव्होट टेबल्स व पिव्होट चार्ट्सद्वारे मोठ्या डेटाचे विश्लेषण करण्याचे तंत्र शिकवले जाईल. याशिवाय चार्ट्स, डॅशबोर्ड व डेटा व्हिज्युअलायझेशन तयार करणे, एआयचा प्रभावी वापर आणि व्यावसायिक उदाहरणांवर आधारित सराव घेतला जाणार आहे. व्यावसायिक, व्यवस्थापक, उद्योजक, विद्यार्थी आणि व्यवसाय मालकांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil: कर्जतमधील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही; दिलीप वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

Solapur Crime: मेहुणीला शिक्षणासाठी घरी आणलं, पत्नी असताना तिच्यासोबत लग्न केलं अन्...; सासऱ्याने घडवला रक्तरंजित थरार

VIDEO : मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य; PM मोदींबद्दल बोलताच कार्यक्रमात गोंधळ, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण, नेमकं काय घडलं?

Madhuri Dixit Kon Honaar Karodpati : "बाई, तुम्ही खूप कडक बोलताय..."; शिक्षिकेसमोर थेट विद्यार्थी बनली माधुरी दीक्षित! 'कोण होणार करोडपती'मधील सुंदर क्षणाचा व्हिडिओ व्हायरल!

Latest Marathi News Update : चौकशीपूर्वीच रुग्णालयातून धूम ठोकून राणा सूर्यवंशी पसार! बारामती हल्ला प्रकरणात खळबळ, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT