Adverse effects diarrhea registration work association demand necessary measures sakal
पुणे

दस्त नोंदणीच्या कामावर विपरीत परिणाम

आवश्यक उपाययोजना करण्याची असोसिएशनची मागणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दुय्यम निबंधक कार्यालयातील निलंबित आणि बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या जागेवर कनिष्ठ लिपिकांना बसवून कामकाज करण्यात येत आहे. यातील नवख्या लिपिकांना कामकाजाची माहिती नसल्यामुळे ऑनलाइन भाडेकरारासह इतर दस्त नोंदणीच्या कामावर विपरीत परिणाम झाला आहे. वेळेत दस्त नोंदणी व्हावी, यासाठी तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट संघटनेने केली आहे.

शहरातील नोंदणी विभागातील दुय्यम निबंधक आणि प्रभारी वरिष्ठ लिपिकांनी रेरा कायद्याचे उल्लंघन करून दस्त नोंदणी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून ४४ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी काही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. काहींची बदली केली, काहींची विभागीय चौकशी सुरु आहे, तर काहींना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्यामुळे कनिष्ठ लिपिकांकडून ती कामे करून घेण्यात येत आहेत.

परंतु त्यांना नोंदणी विभागाचे दुय्यम निबंधक पातळीवरील कामकाजाची फारशी माहिती नसल्यामुळे ऑनलाइन भाडेकरार आणि दस्त नोंदणीचे काम प्रभावित झाले आहे, अशा आशयाचे निवेदन संघटनेच्या वतीने सहजिल्हा निबंधक अनिल पारखे यांना देण्यात आले. या वेळी शिष्टमंडळात अध्यक्ष सचिन शिंगवी, पदाधिकारी मगरध्वज काशीद, योगेश पंपालिया, जयदीप म्हाळगी उपस्थित होते.

आरटीई प्रवेश, सरकारी कामकाज, आरटीओ कार्यालयात वाहन नोंदणी, भाडेकरूंना सोसायटीमध्ये प्रवेश, नवीन बँक खाते आयटी रिटर्न अशा विविध कामांसाठी नागरिकांना पत्त्याचा पुरावा म्हणून ऑनलाइन भाडे करार ग्राह्य धरला जातो. दुय्यम निबंधक हवेली क्रमांक ४, ७, ११, १४, १६, २१, २२ या कार्यालयांमध्ये वारंवार निवेदने देऊनही वेळेत दस्त नोंदणी होत नाही, अशी तक्रार निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara: देशात भाजप असताना कॉक्रोच जनता पक्षाची गरज काय? आठवले म्हणाले, राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही

Pandharpur: विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींची झीज, संवर्धनाच्या कामासाठी २३,२४ जूनला दर्शन पूर्ण बंद

Satara: महायुतीत खदखदीची चर्चा, कऱ्हाडात भाजप प्रदेशाध्यक्षांची बैठक; मित्रपक्षांच्या मंत्र्यांनी फिरवली पाठ

INDW vs PAKW: भारताची टी-२० वर्ल्डकप मोहीम आजपासून; आज भारत-पाक आमनेसामने, कशी असेल Playing 11

पाण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी, भाजप कार्यकर्त्याची हातोड्यानं ठेचत हत्या, २ सख्खे भाऊ गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT