Denin-and-Kahina 
पुणे

जाहिरातींत छोट्या पुणेकरांचे पाऊल पुढे...

प्रणिता मारणे

पुणे - लहान मुलांच्या साबणाच्या जाहिरातीत दुडूदुडू धावणारे गोंडस बाळ... फास्ट फूडच्या जाहिरातीमध्ये माधुरी दीक्षितबरोबर डान्स करणारा चुणचुणीत मुलगा... अशा अनेक जाहिरातींमध्ये आपल्याला लहान मुले दिसतात. यातील अनेक मुले ही पुण्यातील आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी झळकण्यात ‘छोटे पुणेकर’ही पुढे आहेत. 

टेलिव्हिजनवरील विविध जाहिराती, कॅलेंडर, पोस्टर्स किंवा अगदी ग्रिटिंग्सवरील गोंडस बाळ आपण अनेक ठिकाणी पाहतो. यातील बहुतांशी मुले पुण्यातील असून, त्यांच्या सहभागाचे प्रमाणही वाढत आहे. अगदी दहा दिवसांच्या मुलापासून १५ वर्षांपर्यंतच्या मुलांचा विविध जाहिरातींमध्ये समावेश आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रॅंडचे लहान मुलांचे कपडे, कार्टून्सचे कॅलेंडर अशा विविध ठिकाणी पुण्यातील मुलांचा चेहरा दिसतो. वर्षभरातून शहरातील सुमारे १०० मुले विविध जाहिराती आणि पोर्टफोलिओमध्ये दिसून येतात. त्यामुळे जाहिराती, पोस्टर्ससाठी एका महिन्यात किमान ३ ते ४ मुलांची निवड होते. प्रॉडक्‍शन हाउस किंवा दिग्दर्शक नेहमी नवीन चेहऱ्यांच्या शोधात असतात. त्यामुळे त्यांना अपेक्षित असलेले चेहरे ते नेहमी शोधत असतात. 

मुंबईच्या तुलनेने पुण्यात याबाबत स्पर्धा कमी आहे. त्यामुळे पुण्यातील लहान मुलांचा सहभाग हा जास्त असलेला दिसून येत आहे. पालकांचे अनेक फोटोग्राफर्सकडे लहान मुलांचे पोर्टफोलिओ, व्हिडिओ तयार करून घेण्याचे प्रमाणही वाढले असल्याने ऑडिशन्सद्वारे विविध ठिकाणी झळकण्याची संधी वाढते.

विविध उत्पादनांच्या जाहिरातींसाठी मुंबईच्या तुलनेत पुण्यातील लहान मुलांना मागणी वाढत आहे. दिग्दर्शकांना अपेक्षित निरागस चेहरे पुण्यामध्ये मिळत आहेत. जाहिरातींसाठी आणि पोर्टफोलिओसाठी रोज किमान १० ते १५ फोन येतात. त्यामुळे जाहिरातींमध्ये पुण्यातील लहान मुलांचा सहभाग वाढला आहे.
- श्रीकृष्ण परांजपे, छायाचित्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यात १२ जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा कायम पावसाला पोषक वातावरण

Sinhagad Fort : जिथे शिवरायांच्या मावळ्यांनी पराक्रम गाजवला, त्या सिंहगडावर उभारणार १०० फुटी भगवा ध्वज

मराठी की अमराठी... तेजश्री प्रधानला दुसऱ्या लग्नासाठी कसा मुलगा हवाय? म्हणते- माझा होणारा नवरा फक्त...

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

25 लाखांचा प्रश्न आला, उत्तरही बरोबर होतं; तरी गेम सोडला! फीअभावी शाळेबाहेर पडलेला आज 400 मुलांचा ‘गुरू’

SCROLL FOR NEXT