Untitled-1.jpg
Untitled-1.jpg 
पुणे

सल्ला खड्ड्यांच्या राजाचा! 

- संतोष खुटवड

वर्षानुवर्षे वाढत जाणाऱ्या खड्ड्यांच्या साम्राज्यात तुमचं सहर्ष स्वागत. विघ्नहर्त्याच्या आगमनाने तुम्ही आनंदाने चिंतामुक्‍त होऊन नाचत असाल. पण चांदा ते बांद्यापर्यंतचा मेगा हायवे असो कि ग्रामीण, डोंगराळ भागातील रस्ता. त्यावर माझ्या सैनिकांना चुकविताना कित्येकांचा कपाळ मोक्ष होतो तर कित्येकांना जीव गमवावा लागतो....लागू देत मला काय त्याचे?

>

वरुण राजाच्या मदतीनं पावसाळ्यात तर मानव प्राण्यावर हल्ला करण्यासाठी माझ्या सैनिकांची कुमक मला वाढवावीच लागते. इथल्या राजा दरवर्षी रस्ता दुरुस्तीवर करोडोंचा खर्च करतो. पण माझ्या आक्रमणामुळे मुळातच कमकुवत असणारे रस्ते लगेच उद्‌ध्वस्त होतात. अशा वेळी कारभारातील बाबू, कॉन्ट्रॅक्‍टर आणि टक्केवारी कायम माझ्या मदतीला धावून येते. तसे काही इलाख्यातील मजबूत रस्त्यांवर मला अजून झेंडा रोवण्यात यश मिळाले नाही. मोठ मोठे सरदार, कारभारी आलिशान बग्गीतून फिरत असतात. पण इथल्या सामान्य रयतेचे वर्षानुवर्षे माझ्यामुळे कंबरडे मोडते, हाडे खिळखिळी होतात
...होऊ देत मला काय त्याचे? 

सध्या सगळीकडे डागडुजी, पॅचवर्क सुरू आहे. पण तुम्ही भरलेल्या करातूनच पक्के रस्ते बनवले जात नाहीत. रस्त्यांवर खड्डे पडणारच नाहीत, असे तंत्र शोधून काढण्याचा मंत्र या देशीच्या अभियंत्यांना बुद्धीदात्या गणरायाने दिलाच नाही. दर वर्षी प्रचंड मनस्ताप देणाऱ्या असुरक्षित प्रवासाविरुद्ध लढण्याची मानसिकता सध्या हरवून बसलिये. आरक्षण, मागण्यांसाठी आंदोलने, संप करणाऱ्या इथल्या रयतेचा सरकारला जाब विचारण्याचा लढवय्या बाणा हरवलाय? ...हरवुदेत, मला काय त्याचे? 

खड्डांचे नुसतेच सेल्फी घेत, शहरी, ग्रामीण रस्त्यांवर झालेल्या चाळणीमधून रस्ता शोधत तर कधी खड्ड्यात पडल्याने झालेल्या जखमेतून भळभळणारे रक्‍त पुसत आजपर्यंत मानव एक स्पिरीट म्हणून जगत आलाय अन्‌ या पुढेही तसाच जगत राहणार...राहू देत, मला काय त्याचे? 

सध्या सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्यांची चलती आहे. पण एक दोन वर्षातच माझ्या हल्ल्यात तर कधी माझ्या कॉंट्रॅक्‍टदाराला कमवू देत या मानसिकतून कधी कधी चांगले रस्तेही उखडून नवीन तयार केले जातात....करू देत मला काय त्याचे? 

तुम्ही सतर्क राहिला नाही तर तुमच्यासाठी कायमच बुरे दिन अन्‌ माझ्यासाठी अच्छे दिन. सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नावाने दात ओठ खण्यापेक्षा पक्‍क्‍या रस्त्यांच्या मूलभूत हक्कासाठी जागरूकता दाखवली नाहीतर तर एखाद्या खड्ड्यात पडून तुमची बुरी खबर ऐकण्याची वेळ तुमच्याच कुटुंबावर येईल...येऊ देत, मला काय त्याचे? 

सर्वत्र पसरलेल्या माझ्या साम्राज्यामुळे वाहनांचा वेग मंदावतो. कमालीची वाहतूक कोंडी होते. अनेकांची कामे रखडतात. ऑफिस आणि घरात उशिरा येण्यामुळे चाकरमान्यांचा ढोल बनतो. विकासाची कास धरून सिंहासनावर बसलेल्यांनीच तुमच्या गाडीची चाके पंक्‍चर केलीत...करू देत, मला काय त्याचे? 

देशभरात स्मार्ट सिटीचा घाट घालणाऱ्या कारभाऱ्यांनी ठरवलं तर माझ्या साम्राज्याचे नामोनिशाण शिल्लक राहणार नाही. पण त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन सोयी-सुविधांकडे काणाडोळा करण्यांविरुद्ध शड्डू ठोकायला हवा. राज्यकर्ते येतील अन्‌ जातील. पण खड्ड्यांसारखे अनेक प्रश्‍न कायमचे मिटवले नाहीत तर तेच पिढ्यापिढ्या तुमच्या छाताडावर बसून तुमचाच गळा दाबतील. तुमच्या स्वातंत्र्याला 71 वर्षे होऊन गेली. आता पुन्हा नव्या क्रांतीची धगधगती मशाल पेटवा. खड्डेमय रस्त्यांना विरोध केला नाही तर अमेरिका, जपानमधील चकचकीत रस्त्यांसारख्या रस्त्यांवरील प्रवासाचे स्वप्न दिवास्वप्नच राहील. नाहीतर अशाच एखाद्या खड्ड्यात पडून तुमचीच जीवन ज्योत विझेल. तुमचीच जीवन ज्योत विझेल...विझु देत मला काय त्याचे! 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT: सीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली; सलग दुसरी घटना घडल्यानं खळबळ

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: उद्धव ठाकरेंची विकेट आधीच पडलीए, ते क्लीनबोल्ड झालेत; CM शिंदेंना विश्वास

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

SCROLL FOR NEXT