advocate
advocate 
पुणे

वकिलांचे बाररुम सहा महिन्यानंतर उघडणार 

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाचा संसर्ग वाढू होऊ नये म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले कौटुंबिक न्यायालयातील बाररुम खुले करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र बाररुमचा वापर करताना मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतराचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी याबाबत आदेश दिला आहे. 

येथील कामकाज 21 सप्टेंबरपासून दोन शिफ्टमध्ये सुरू होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बाररूम खुली करण्याची विनंती करणारे निवेदन दी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनतर्फे न्यायाधीश काफरे यांना देण्यात आले होते. सध्या येथील न्यायाधीशांची उपस्थिती 100 टक्के करण्यात आली आहे. इमारतीमधील बाररूम सुरू करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यांचा वापर करीत असताना वकिलांनी कोरोनाबाबतच्या सर्व खबरदारी घ्याव्यात, असे आवाहन असोसिएशनच्या अध्यक्ष ऍड. वैशाली चांदणे यांनी केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT