Adwait Bhosale sakal
पुणे

Adwait Bhosale : आचार्य अकॅडमीचा अव्दैत भोसले लष्कराच्या टेक्निकल एन्ट्री स्कीममध्ये देशात तिसरा

बारामती तालुक्यातील माळेगावच्या अव्दैत लक्ष्मण भोसले याने भारतीय लष्कराच्या टेक्निकल एन्ट्री स्कीम 49 (इंडियन आर्मी टीईएस- 49) परीक्षेत देशपातळीवर तिसरा रॅंक मिळवून बारामती आणि राज्याचे नाव उंचावले आहे.

मिलिंद संगई,

बारामती - तालुक्यातील माळेगावच्या अव्दैत लक्ष्मण भोसले याने भारतीय लष्कराच्या टेक्निकल एन्ट्री स्कीम 49 (इंडियन आर्मी टीईएस- 49) परीक्षेत देशपातळीवर तिसरा रॅंक मिळवून बारामती आणि राज्याचे नाव उंचावले आहे.

कोविडच्या प्रतिकुल काळात येथील आचार्य अकॅडमीने मार्गदर्शनासाठी विशेष वर्ग सुरु केल्यामुळे हे यश मिळाल्याचे अव्दैत आणि त्याच्या पालकांनी सांगितले.

अव्दैत हा साताराच्या सैनिक शाळेचा विद्यार्थी. कोविडमुळे त्याला नाइलाजाने शाळाच बंद झाल्याने घरी यावे लागले. एनडीएची परिक्षा अवघ्या चार ते पाच महिन्यावर आली असताना लष्करामध्ये अधिकारी होण्याचे स्वप्न असलेल्या अव्दैतच्या करियरपुढे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.

यावेळी अव्दैतच्या वडिलांनी केलेल्या आग्रहामुळे आचार्य अकॅडमीने अवघ्या सात विद्यार्थ्यांसाठी एनडीए परिक्षेच्या तयारीसाठी ऑफलाईन वर्ग सुरु केला. या विद्यार्थ्यांमधील पाच विद्यार्थ्यांनी एनडीए तसेच युपीएससी परिक्षेत उज्जल यश संपादन केले.

यापैकी अव्दैतने देशपातळीवर तिसरा रॅंक मिळवून यश मिळवले आहे. याअगोदर प्रज्वल राऊत हाही देशात सहाव्या रँकने उत्तीर्ण झाला आहे. पुढच्या वर्षी पुन्हा ही परीक्षा दिली. याच प्रयत्नात त्याने हे यश पुढच्या एक वर्षात प्रशिक्षण पुर्ण करून अव्दैत लष्करात लेफ्टनंट पदावर क्लास वन अधिकारी म्हणून कामास सुरुवात करणार आहे. आचार्य अकॅडमीचे संस्थापक ज्ञानेश्वर मुटकुळे, सुमीत शिनगारे, प्रवीण ढवळे व कमलाकर टेकावडे यांच्यासह सर्वांनी अव्दैतचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

SCROLL FOR NEXT