Pune University Sakal
पुणे

‘एएफएमसी’ व पुणे विद्यापीठात सामंजस्य करार

आरोग्य क्षेत्रात काम करणारे सर्व प्राध्यापक, संशोधक व प्रत्यक्ष काम करणारे डॉक्टर एकत्र आले, तर नक्कीच या क्षेत्रात मोठी कामगिरी करता येईल.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून (Pune Univerisity) आरोग्य क्षेत्रातील संशोधनाला प्राधान्य दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठाने आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज (एएफएमसी) (AFMC) समवेत सामंजस्य करार (Reconciliation Agreement) केला. या करारावर गुरुवारी स्वाक्षऱ्या झाल्या. (AFMC and Pune University Reconciliation Agreement)

आरोग्य क्षेत्रात काम करणारे सर्व प्राध्यापक, संशोधक व प्रत्यक्ष काम करणारे डॉक्टर एकत्र आले, तर नक्कीच या क्षेत्रात मोठी कामगिरी करता येईल, असा विश्वास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केला. करारांतर्गत अध्यापक, संशोधन, प्रयोगशाळा, शैक्षणिक कार्यक्रम, माहिती आदींचे आदानप्रदान होणार असून, विद्यार्थ्यांना इंटर्नशिपचीही संधी मिळेल.

या वेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, ‘एएफएमसी’चे ब्रिगेडियर इनचार्ज अजय श्रीवास्तव, लेफ्टनंट कर्नल ए. डब्ल्यू. काशीफ, विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Munde Case: ''वाल्मिक कराडच्या बंगल्यातून अजूनही सूत्र हलतात, धनंजय मुंडेंचा संबंध नाही'', ज्ञानेश्वरी मुंडेंनी स्पष्ट सांगून टाकलं

रोहित शर्मा, राहुल द्रविड यांच्या शैलीचं क्रिकेट T20 World Cup 2026 मध्ये चालणार नव्हते... सूर्यकुमार यादवचे स्पष्ट मत

Stock Market Today: शेअर बाजार लाल रंगात बंद! मोठी घसरण झाली तरी हे स्टॉक मात्र वाढले

इराण-इस्रायल तणावात सोन्याच्या किमती घसरल्या; खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे का? तज्ञांनी उत्तर देत गुंतवणूकदारांचा प्रश्नच सोडवला!

काही महिने सोबत राहिले पण... हंसिका मोटवानीचा घटस्फोट कशामुळे झाला? खरं कारण समोर

SCROLL FOR NEXT