AFMC Convocation Proceedings  sakal
पुणे

AFMC Convocation Proceedings : ‘एएफएमसी’ची ५८ वी तुकडी सैन्यात दाखल

लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाची (एएफएमसी) ५८ वी तुकडी गुरुवारी सैन्यात दाखल झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाची (एएफएमसी) ५८ वी तुकडी गुरुवारी सैन्यात दाखल झाली आहे. महाविद्यालयाच्या कीर्ती चक्र परेड ग्राउंडवर दीक्षान्त संचलन पार पडले. या वेळी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून ‘एएफएमसी’चे संचालक लेफ्टनंट जनरल दलजित सिंग उपस्थित होते.

दीक्षान्त संचलनाचे नेतृत्व लेफ्टनंट सुशील कुमार सिंग यांनी केले. ‘एएफएमसी’मधून १४० कॅडेट्सनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यातील पाच कॅडेट्स हे मित्र देशांचे होते. तर ११२ कॅडेट्स हे भारतीय सैन्याच्या वैद्यकीय सेवेत दाखल होणार आहेत. यात ८७ पुरुष तर २५ महिला कॅडेट्सचा समावेश आहे.

अभ्यासक्रमाच्या काळात विशेष कामगिरी बजावणाऱ्या कॅडेट्सचा यावेळी सन्मान करण्यात आला. ‘राष्ट्रपती सुवर्णपदक’ आणि ‘कलिंग करंडक’ हे कॉलेजचे दोन अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार आहेत. यावर्षी ‘राष्ट्रपती सुवर्णपदक’ फ्लाइंग ऑफिसर आयुष जैस्वाल यांना आणि ‘कलिंग ट्रॉफी’ डॉ. ऐश्वर्या रामकृष्णन अय्यर यांना प्रदान करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme court on firecracker ban : "विराट कोहलीची मदत घ्या!"; फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, पण सरकारला झापलं!

Raj Thackeray: ''2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं..'' राज ठाकरेंचा चिमटा; दोन्ही ठाकरेंसह मुख्यमंत्री एकाच मंचावर

Pune Theft : मार्केटयार्डात डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

Mulshi News : मुळशी तालुक्यात पिक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

Pachod News : कत्तलीसाठी नेण्यात येणारे २३ बैल पाचोड पोलिसांकडून जप्त; आयशर वाहनासह २४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT