Roll Ball game, Pune, Savitribai Phule Pune University  
पुणे

अखेर 18 वर्षांनी पुणे विद्यापीठाने रोल बॉलला स्वीकारले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रोल बॉल या खेळाचा जन्म 18 वर्षापूर्वी पुण्यात झाला, हा खेळ जगातील 50 देशांमध्ये खेळला जात होता, देशातील अनेक विद्यापीठे या खेळाची स्पर्धा आयोजित करतात. पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून या खेळाचा समावेश करण्यास टाळाटाळ केली जात होती. अखेर गुरुवारी उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर पुणे विद्यापीठाने या खेळाचा स्वीकार केल्याचे पत्र संघटनेला दिले आहे.

पुणे जिल्हा रोल बॉल असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजू दाभाडे यांनी हा खेळ सुरू केला. त्यांनी पाठपुरावा करून स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया युनिव्हर्सिटी मध्ये रोल बॉलचा समावेश करून घेतला. शालेय पातळीवर 14, 17, 19 वयोगटातील विद्यार्थी नियमितपणे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होतात. जम्मू विद्यापीठ, पंजाब विद्यापीठ, आयटीएम विद्यापीठ ग्वाल्हेर हे विद्यापीठांचे संघ हा खेळ गेल्या तीन वर्षापासून नियमितपणे पाठवत आहेत. पुणे विद्यापीठाने रोल बॉलचा समावेश करावा यासाठी गेले अनेक वर्ष पाठपुरावा सुरू केला होता. पण त्यास दाद दिली जात नव्हती.

‘उच्च तंत्र शिक्षण मंत्रालय @पुणे’ या उपक्रमात याबाबत उदय सामंत यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्यांनी हा विषय लक्षात घेताच पुणे विद्यापीठाला हा खेळ स्वीकारण्याचे आदेश दिले. त्यानंतर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक दीपक माने यांनी ऑल इंडिया युनिव्हर्सिटी मध्ये पुणे विद्यापीठाचा संघ प्रतिनिधित्व करेल असे पत्र असोसिएशनला दिले आहे, असे असोशिएशचे अध्यक्ष गजानन थरकुडे यांनी सांगितले. ‘‘गेल्या काही वर्षापासून पुणे विद्यापीठाकडे याचे पाठपुरावा सुरू होता, त्यास आज यश मिळाल्याने आनंद झाला आहे. याबद्दल पुणे विद्यापीठाचे आभार’’ असे राजू दाभाडे यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रोल बॉल गेम नेमका कसा खेळला जातो?

  •  अन्य सांघिक खेळाप्रमाणेच हा खेळ दोन टीममध्ये खेळवला जातो.
  •  या खेळात एकूण 12 खेळाडू असतात यातील 6 मैदानात उतरतात तर सहा राखीव असतात. 
  •  गोल पोस्टमध्ये बॉल डागण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला चकवा देत हा खेळ खेळला जातो. आपल्या खेळाडूकडे बॉल पास करताना तो जमीनीवर बाउन्स करणे अनिवार्य असते. 
  •  या खेळाच्या मैदानाला कोर्ट असे संबोधतात.  कोर्टचा आकार हा 28 ते 40 मीटर (92 ते 131 मीटर) इतका असतो.
  •  पुण्यात 2005 मध्ये हा गेम पहिल्यांदा खेळवण्यात आला
  •  जगभरातील 50 देशात हा गेम खेळला जातो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्यांच्या ठसक्याने रंगायचा लावणीचा फड! त्या शकुंतलाताई नगरकर काळाच्या पडद्याआड, कलाविश्वावर शोककळा

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

IND vs NZ T20I Squad: भारत-न्यूझीलंड ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; अष्टपैलू खेळाडूची माघार, १५ जणांची तगडी टीम

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

PITRU PAKSHA 2026 VASTU TIPS: घरात सुख-शांती आणि सकारात्मकता राहिल टिकून! पितृपक्षापूर्वी फक्त 'या' ४ वस्तू बाहेर काढा

SCROLL FOR NEXT