after 25 years sharad pawar meeting will held in velhe lok sabha election Sakal
पुणे

पंचवीस वर्षानंतर उद्या वेल्ह्यात होणार शरद पवारांची सभा; पंधरा हजार नागरिक उपस्थित राहणार महाविकास आघाडीचा दावा

महाविकास आघाडी मधील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या जोमाने कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे

मनोज कुंभार

वेल्हे : बारामती मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ प्रदीर्घ कालावधीनंतर म्हणजे पंचवीस वर्षानंतर शरद पवार यांची वेल्ह्यात मंगळवार (ता. ३०) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मेंगाई देवस्थान ट्रस्टच्या कुस्ती आखाडा मैदाना समोरील प्रांगणात सभा होणार असून या सभेसाठी महाविकास आघाडीने जोरदार मोर्चे बांधणी केली

असून दुर्गम भागातील दऱ्याखोऱ्यातून शेतकरी बांधवासह महिलांची उपस्थिती मोठी राहणार असून तालुक्यातील सुमारे पंधरा हजार नागरिक उपस्थित राहतील असा दावा तालुक्यातील महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका निरीक्षक अतुल पवार

तालुकाध्यक्ष संतोष रेणुसे, माजी अध्यक्ष शंकरराव भुरुक,काँग्रेस तालुका अध्यक्ष नाना राऊत व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष दीपक दामगुडे यांनी केला आहे. या सभेमध्ये शरद पवार काय बोलणार याची मोठी आहे उत्सुकता नागरिकांना लागली आहे .या सभेसाठी जोरदार तयारी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे या ठिकाणी हेलिपॅड ची सुविधा करण्यात आली आहे.

महाविकास आघाडी मधील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या जोमाने कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे यामधील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमोल नलावडे ,दिनकर धरपाळे,माजी सभापती दिनकर सरपाले ,

सीमा राऊत, यांच्यासह उद्धव ठाकरे गटाचे निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गावं गाव पिंजून काढले असून तालुकाध्यक्ष दीपक दामगुडे यांच्यासह माजी तालुका अध्यक्ष बाळासाहेब देशपांडे, उमेश नलावडे, शिवाजी खुळे, नितीन भोसले, संतोष रेणुसे, लक्ष्मण कडू, आधी सह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून गावोगावी घोंगडी बैठका भेटीगाठी घेऊन नियोजन करण्यात आले आहे.

गेल्या तीन लोकसभेच्या निवडणुकांमध्ये राजगड तालुक्यातील नागरीकांनी शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्यावर विश्वास टाकत तीनही निवडणुकांमध्ये मताधिक्य दिले होते. मात्र राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याने तसेच महत्त्वाची पदे असलेले अनेक पदाधिकारी अजित पवार यांच्या सोबत गेल्याने तालुक्यात सुप्रिया सुळे यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे.

अजित पवार हे शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत असून त्यातच भोर मध्ये झालेल्या सभेमध्ये यांनी सुप्रिया सुळे यांनी पंधरा वर्षे काय केले नुसते बोलून चालत नाही तर काम करावे लागते असे वक्तव्य केले होते या वक्तव्यावर शरद पवार यावर काय प्रतिक्रिया देणार याची उत्सुकता तालुक्यातील नागरिकांना लागली आहे.

या सभेसाठी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, सुप्रिया सुळे, काँग्रेस कडून आमदार संग्राम थोपटे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून मिलिंद नॉर्वेकर उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT