पुणे

चक्क बोकड-शेळीचे लग्न लावून केले आंदोलन!

विजय मोरे

उंडवडी : जनाई शिरसाईचे उपसा सिंचन योजनेचे पाणी बारामतीच्या दुष्काळी भागाला मिळावे, या मागणीसाठी सुरु असलेल्या उंडवडी कडेपठार ( ता. बारामती) येथील आंदोलनात आज चौथ्या दिवशी बोकड व शेळीचे मोठ्या थाटामाटात लग्न लावून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी जमा करण्यात आलेले आहेर (निधी) 687रुपये सरकारला पाठवण्यात येणार आहे. 

उंडवडी कडेपठार ( ता. बारामती) येथील चक्री उपोषण आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. सरकार आंदोलनाची दखल घेत नाही. म्हणून आज येथील आंदोलनकर्त्यानी शेळी आणि बोकड यांचा शुभविवाह लावून आगळेवेगळे आंदोलन केले. 

अगदी ग्रामीण भागात जसा एकदा लग्नसोहळा पार पडतो. तशाच पद्धतीने हा शेळी-बोकडाचा विवाहसोहळा पार पडला. यावेळी जमलेल्या लोकांना शेळी-बोकडाच्या लग्नासाठी अक्षदा वाटप करण्यात आला. बोकड आणि शेळीला बाशिंग आणि मंडवळ्या बांधून दोघांमध्ये (धोती) आंतरपाठ धरुन खास शैलीत मंगलाष्टक गायन केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य भरत खैरे, सरपंच विशाल कोकरे, कल्पना साळुंके, उपसरपंच पोपट गवळी, दूध संघाके संचालक संजय गाडेकर, वैशाली साळुंके, माजी सरपंच विठ्ठल जराड , बापूराव गवळी आदींसह महिला ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सरकार जाणून-बुजून बारामतीच्या जिरायती भागातील पाणी प्रश्नाकडे आणि जनाई शिरसाई योजनेचे पाणी सोडत नाही आणि आंदोलनाकडेही दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे निषेध म्हणून आंदोलनकर्त्यानी आज या मुक्या प्राण्यांचे लग्न लावून निषेध केला.

तसेच यावेळी बोकड आणि शेळीच्या लग्नात ग्रामस्थांनी केलेले पैसेरुपी आहेर (687 रुपये) पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना पाठवण्यात येणार आहेत. जोपर्यंत योजनेचे पाणी सोडण्यात येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार आहे. आंदोलन आणखी तीव्र करणार आहे, अशी माहिती उपोषणकर्ते सतिश जराड व गजानन सरक यांनी दिली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : तामिळनाडूत रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT