Ravindra Dhangekar Esakal
पुणे

Kasba Bypoll Election : कसब्यासाठी काँग्रेसची खेळी; धंगेकर म्हणाले, 'मुक्ता ताईंचे स्वप्न भाजप नाही...'

काँग्रेसचे कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केसरीवाड्यात जाऊन शैलेश टिळक यांची भेट घेतली

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसचे कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केसरीवाड्यात जाऊन शैलेश टिळक यांची भेट घेतली. मुक्ता टिळक यांना अभिवादन करण्यासाठी ते केसरीवाड्यात गेले होते. भाजपने टिळक परिवाराला उमेदवारी नाकारल्यानंतर धंगेकर टिळकांच्या भेटीला गेले आहेत. धंगेकर यांनी घेतली रोहित टिळक यांची देखील भेट घेतली आहे.

तर काँग्रेसकडून कसब्याचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी यावेळी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी, मतदार, कार्यकर्ते यांच्या जिवावर कसबा विधानसभा पोटनिवणडूक आम्हीच जिंकणार आणि त्यांचे स्वप्न आम्ही पूर्ण करून दाखवणार असा विश्वास रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.

या भेटीनंतर काँग्रेसचे कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि सकाळीशी बातचीत केली. यावेळी बोलताना धंगेकर म्हणाले की, गेली 30 वर्षे मी समाजाचं काम केलं. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मी काम केलं आहे. जनतेच काम कारण हे माझ कर्तव्य आहे. मी सर्वाना न्याय देण्याचं काम करतो आणि ही माझी राजकीय जीवनात जमेची बाजू आहे.

पुणेकरांना माझं काम माहीत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या जिवावर मी नक्की निवडून येईल असा विश्वासही रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली आहे. तर पुढे ते म्हणाले की, मुक्ताताईंचे स्वप्न भाजप नाही काँग्रेस पूर्ण करणार आहे. त्या कामासाठी पुणेकर मला साथ देतील.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. निवडणुकीकरिता भाजपकडून आपले उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. निवडणुकीकरिता भाजपाकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT