पुण्यातील संभाजी पुलावर गणेशोत्सवानंतर मेट्रो मार्गाचे गर्डर बसविणार sakal
पुणे

पुण्यातील संभाजी पुलावर गणेशोत्सवानंतर मेट्रो मार्गाचे गर्डर बसविणार

राष्ट्रीय महामार्गांच्या निकषांनुसार काम होणार असल्याने वाहतुकीला अडथळा होणार नसल्याचे महामेट्रोचे म्हणणे

मंगेश कोळपकर ः सकाळ वृत्तसेवा

पुणे : संभाजी पुलावर मेट्रो मार्गासाठी गर्डर टाकण्याचे काम गणेशोत्सवानंतर पूर्ण होणार असल्याचे स्पष्टीकरण महामेट्रोने केले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या निकषांनुसार हे काम होणार असल्यामुळे वाहतुकीला कोणत्याही प्रकारे अडथळा होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

वनाज- रामवाडी मेट्रो मार्गाचे काम सध्या सुरू आहे. त्यातील वनाज- गरवारे महाविद्यालय दरम्यानचे पहिल्या टप्प्यातील काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या मार्गावरच स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक ते डेक्कन जिमखाना बसस्थानक दरम्यान मेट्रो मार्ग नदीपात्रातून जाणार आहे. त्यासाठी खंडुजीबाबा चौकात संभाजी पुलावरून मेट्रोचे मार्ग जाणार आहे. मात्र, या मार्गामुळे गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीला अडथळा येऊ शकतो, असे म्हणत काही मंडळे आणि राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तूर्त ते काम थांबविण्याची सूचना केली आहे. त्यामुळे हे मेट्रोचे तेथील काम थांबले आहे.

या बाबत मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ते म्हणाले, ‘‘राष्ट्रीय महामार्गाच्या निकषांनुसार जमिनीपासून ५ . ५ मीटर उंचीपर्यत वाहतुकीसाठी जागा लागते. त्यामुळे बोगद्यांचे काम होतानाही जमिनीपासून तेवढी उंची ठेवली जाते. राष्‍ठ्रीय महामार्गांवर होणारी वाहतूक, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची उंची, त्यांच्यात ठेवला जाणारा माल लक्षात घेऊन हे निकष ठरविण्यात आले आहेत. त्यानुसारच महामेट्रोचे पुण्यात काम सुरू आहे. संभाजी पुलावर जमिनीपासून सुमारे ६. ५ मीटर उंचीवर मेट्रो मार्गांसाठी गर्डर टाकले जाणार आहेत.’’

दोन खांबांपासून मेट्रो मार्गासाठी गर्डर टाकले जाणार आहेत. त्यांची रुंदी सुमारे २७ मीटर आहे. त्या आकाराचे गर्डर तयार करण्यात येत आहेत. स्टिलचे गर्डर तेथे आले आहेत. सिमेंटचे गर्डरही अल्पावधीत तयार होतील. पावसाचा जोर कमी झाल्यावर आणि गणेशोत्सवानंतर संभाजी पुलावर गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

Fraud Case: डॉक्टरची 2 कोटी 24 लाखांची फसवणूक, ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

Hindi Medium Engineering: इंग्रजीची अडचण दूर! आता चक्क हिंदीतून सिव्हिल इंजिनिअरिंग; विद्यार्थ्यांना मिळणार रु. २ लाखांचे अनुदान

Latest Marathi News Live Update : ३५ दिवसांचा दुष्काळी खंड संपला; यवतमाळ-वणीत पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवदान

SCROLL FOR NEXT