Moshi hoarding 
पुणे

मोठी बातमी! पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये होर्डिंग कोसळलं; अनेक गाड्या दबल्या

Pimpri Chinchwad hoarding collapsed: घाटकोपरमधील घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे.

कार्तिक पुजारी

पिंपरी- पिंपरी चिंचवडमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. मोशीमध्ये हे होर्डिंग कोसळल्याचं कळतंय. यात चार गाड्या होर्डिंगखाली दबल्या केल्या आहेत. त्यामुळे गाड्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेले नाही. घाटकोपरमधील घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १६ लोकांचा मृत्यू झाला होता.

पिंपरी चिंचवडमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. शिवाय, जोराचा वारा देखील वाहू लागला आहे. त्यातच सायंकाळी साडेचारच्या सुमारास मोशीमध्ये रस्त्याच्या कडेला असलेले होर्डिंग कोसळले. सुदैवाने हे होर्डिंग रस्त्यावर न पडता विरुद्ध बाजूला पडले. होर्डिंगच्या बाजूला उभ्या असलेल्या चार वाहनांवर हे होर्डिंग पडले. यात वाहनांचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाहने पार्क केलेली होती. त्यामुळे वाहनामध्ये कोणीही नव्हतं. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महापालिकेकडून यासंदर्भातील अधिक माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, घाटकोपरमधील घटनेनंतर मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत होर्डिंग काढण्याचे काम सुरु झालेले आहे. मोशीतील पडलेले होर्डिंग अनधिकृत होते का? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT