अष्टापूर (ता. हवेली) - पर्यावरणाचे महत्त्व ओळखून कोणत्याही शासकीय मदतीविना श्रमदानातून वाढविलेल्या झाडांसोबत ग्रामस्थ. 
पुणे

हरितक्रांतीनंतर आता करमुक्तीचा संकल्प

सकाळवृत्तसेवा

केसनंद - पूर्व हवेलीतील अष्टापुरात पर्यावरणाचे महत्त्व ओळखून ग्रामस्थांनी कोणत्याही शासकीय मदतीविना सुमारे अठरा हजार झाडांचे रोपण व संवर्धन करून हरितग्रामची संकल्पना सत्यात आणली आहे. येथील फळझाडांच्या उत्पन्नातून गावातील ग्रामस्थांना करमुक्त करण्याचा ग्रामपंचायतीचा संकल्प आहे.

अष्टापूर ग्रामस्थांनी गावात विकासकामांसह शाळाही आदर्श व सुसज्ज केली आहे. दुष्काळी व प्रतिकूल परिस्थितीत अष्टापूर ग्रामस्थांनी प्रसंगी ठिबक सिंचन व श्रमदानातून १८ हजार झाडांची वनराई करून पर्यावरण जपले आहे. गावातील रस्ते, शाळा, सार्वजनिक ठिकाणे, तसेच माळरानावरही झाडे लावल्याने गाव परिसर हिरवाईने नटलेला दिसत आहे.

फळाफुलांच्या झाडांबरोबरच वड, चिंच व करंज अशा मोठ्या झाडांचाही यांत समावेश असल्याने गावात ग्रामस्थांना विसाव्यासाठी ठिकठिकाणी सावलीही उपलब्ध झाली आहे. गावात प्रत्येक घरापुढे झाड आहे. दशक्रिया विधीही वनराईच्या सावलीत होतो.

उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार ॲड. अशोक पवार, माजी आमदार बाबूराव पाचर्णे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थ दरवर्षी वृक्षारोपण करतात. गेल्या दहा वर्षांपासून ही वृक्षलागवड अठरा हजारांवर गेल्याचे माजी पंचायत समिती सदस्य सुभाष जगताप यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

पुण्याची बातच न्यारी! मृणाल ठाकूरने पुण्यात येताच केली 'ही' गोष्ट, खास मराठी पोस्ट करत म्हणाली... 'पुण्यात आलो आणि...'

Latest Marathi News Live Update : अंबाबाई मंदिर गाभारा संवर्धन पूर्ण; आजपासून दर्शन सुरू

Indore Fire Accident : इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू; इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना

Dhangar Community: मेंढपाळ धनगरांसाठी अर्धबंदिस्त मेंढीपालन प्रकल्पाचे संकेत; कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक!

SCROLL FOR NEXT