after leopard attack on the man forest department installed cage in Londhe Vasti in Ambegaon Taluka  
पुणे

अखेर वनविभागाला जाग! बिबट्याने शिक्षकावर हल्ला केल्यानंतर वनविभागाने लावला पिंजरा

वळती परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात होता, नागरिकांना बिबट्यांचे दर्शन होत होते

नवनाथ भेके

निरगुडसर ता.२७ : वळती (ता. आंबेगाव) येथे लोंढे वस्तीत दुचाकी वरून घरी चाललेल्या शिक्षकावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्यानंतर वनविभागाला खडबडून जाग आली आणि अखेर माणसावर हल्ला झाल्यानंतरच वनविभागाने तातडीने लोंढे वस्तीत पिंजरा लावला.

वळती परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात होता, नागरिकांना बिबट्यांचे दर्शन होत होते तसेच पाळीव प्राण्यांचा बिबट्याकडून जीव जात होता, नागरिकांनी बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करून देखील याकडे वनविभाग दुर्लक्ष करत होते परंतु जेंव्हा माणसावर बिबट्याने हल्ला केला तेंव्हा वनविभागाला जाग आली.

शिक्षक ज्ञानेश्वर बाळू लोखंडे हे शनिवार (ता.२५) रोजी सायंकाळी साडे सात वाजता घरी जात असताना लोंढे वस्ती जवळ गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवर हल्ला केला यात लोखंडे हे जखमी झाले परंतु लोखंडे यांनी प्रसंगावधान राखून दुचाकी जोरात पळवल्यामुळे त्यांचे प्राण वाचले .घटनेची खबर ग्रामस्थांनी वन विभागाला दिली . त्यानंतर वनविभागाने तातडीने घटनास्थळी जाऊन पिंजरा लावला,यावेळी वळती गावचे सरपंच आनंद वाव्हळ, पोलिस पाटील प्रकाश लोंढे, देवराम लोंढे,संतोष लोंढे आदी स्थानिक शेतकरी उपस्थित होते .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: अशोक खरातच्या ओकस कार्यालयात ईडीकडून गेल्या तीन तासांपासून झडती सुरू

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT