after Lok Sabha elections Modi government loss power Sachin Sawant politics sakal
पुणे

Sachin Sawant : लोकसभा निवडणुकांनंतर मोदी सरकारच बुलडोजरखाली आल्याशिवाय राहणार नाही - सचिन सावंत

बुलडोजर चालविणारे मोदी सरकार २०२४ च्या निवडणुकीनंतर त्याच बुलडोझरखाली आल्याशिवाय राहणार नाही

सकाळ वृत्तसेवा

Pune News: "देशातील पाच राज्यांच्या निकालानंतर पुढील काळात मोदी सरकार विरोधकांवर अधिक आक्रमण करणार आहे. त्यामुळे ही लढाई आता अटीतटीची नव्हे, तर निकराची असणार आहे. आत्ता बुलडोजर चालविणारे मोदी सरकार २०२४ च्या निवडणुकीनंतर त्याच बुलडोझरखाली आल्याशिवाय राहणार नाही.''

अशा प्रखर शब्दात कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शुक्रवारी भाजपवर हल्ला चढविला. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित "सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहा'चे उद्‌घाटन सावंत व शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या हस्ते झाले.

यावेळी माजी आमदार उल्हास पवार, दीप्ती चवधरी, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या अध्यक्ष सक्षणा सलगर, पिंपरी चिंचवड कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शहर कॉंग्रेस महिला अध्यक्षा पूजा आनंद, दत्ता बहिरट, आयोजक व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी उपस्थित होते.

सावंत म्हणाले, ""इंदिरा गांधी यांनी सोनिया गांधी यांच्या हातावर प्राण सोडले, पती राजीव गांधी यांचा चेहरा देखील सोनिया गांधी यांना पाहायला मिळाला नाही. अशावेळी या देशाला पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या परिवाराने आत्तापर्यंत पार पाडली आहे, हे लक्षात घेऊन गांधी पुढे आल्या.

भाजपने त्यांचे चारित्र्यहनन करून आपली मानसिक विकृती दाखविली, तरीही त्यांनी न डगमगता "शायनिंग इंडिया'च्या काळात कॉंग्रेसला सत्तेवर आणले. पंतप्रधानपदी डॉ.मनमोहनसिंग यांना बसविले. हा त्याग फक्त त्याच करू शकतात.''

"रामायण, महाभारताद्वारे त्यागाची मूल्ये शिकविली जातात. आता लोकांवर अन्याय करण्यासाठी त्याचा वापर केला जातो, याची शरम वाटायला पाहिजे. यासारखा हिंदू धर्माचा दुसरा अपमान होऊ शकणार नाही. भविष्यात तुम्ही देशासाठी काय केले, हे भाजपला सांगावेच लागेल.

त्यांचा हिंदू मुस्लिम फॉर्म्युला चालला नाही. भाजपने विद्यार्थी चळवळ संपविली, विचारवंत, शेतकरी, कामगारांचा आवाज दडपला. तपासयंत्रणांचा दुरुपयोग करून भ्रष्टचाऱ्यांना पाठीशी घातले, हे जनता कधीही विसरणार नाही.'' असेही सावंत यांनी सांगितले.

अंधारे म्हणाल्या, ""सोनिया गांधी यांनी दाखवलेला कणखरपणा हा देशासाठी सेवा, कर्तव्य त्यागाची भावना दाखवितो. भाजपकडून भय, भ्रम व चारित्र्यहनन या अस्त्राचा उपयोग करून विरोधकांना संपवण्याचा डाव आहे. भाजपचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकृत आहे. कॉंग्रेसने आत्तापर्यंत सेवाभाव जपण्याचे काम केले. आता जनतेचे डोळे उघडत असून, भविष्यात जनताच भाजपला त्यांची जागा दाखवेल.''

सलगर म्हणाल्या, ""सोनिया गांधी यांनी नम्रतेने पंतप्रधान पद नाकारले, त्याचा मोठा अभिमान वाटतो. कॉंग्रेस पक्ष नसून विचार आहे. या पक्षाने कधीही जातीयवाद केलेला नाही. इतिहास वाचून त्यावर विचारमंथन केले पाहिजे. देशाला पुढे नेण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्ष करेल.''

- अजित पवार यांना ब्रॅण्ड ऍम्बेसिडर करावे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यावर भाष्य केले. त्यानंतर काही दिवसातच अजित पवार यांनी भाजपबरोबर सत्तेमध्ये गेले. अजित पवार हे विकासासाठी नव्हे, तर तपास यंत्रणेचा ससेमिरा चुकविण्यासाठी त्यांच्यासमवेत गेले. त्यामुळे अजित पवार यांना भ्रष्टाचार निर्मूलन मोहिमेचे ब्रॅण्ड ऍम्बेसिडर केले पाहिजे, अशीही टीका सावंत यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambadas Danve: राज्याच्या डोक्यावर 9 लाख कोटींचं कर्ज, देवाभाऊंच्या 200 कोटींच्या जाहिराती, सगळं भगवान भरोसे...

ED summons : ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा अन् सोनू सुदला ईडीचं समन्स,'या' तारखेला होणार चौकशी, अडचणी वाढणार?

Pune Crime : काल बापाने न्यायालयात एन्काउंटरची भीती केली व्यक्त, आज कृष्णा आंदेकर पोलिसांनी शरण; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

IND vs PAK: जय शाह यांचा पाकिस्तानला दणका; आशिया कपवर बहिष्काराची दिलेली धमकी, आता तोंडावर आपटण्याची वेळ

Sharad Pawar : 'देवाभाऊं'नी महाराजांचे नाव घेऊन बळीराजाकडे ढुंकून पाहिले नाही: शरद पवार

SCROLL FOR NEXT