After many years in Nirvangi the talathi office will be started
After many years in Nirvangi the talathi office will be started 
पुणे

निरवांगीत 13 वर्षानंतर होणार तलाठी कार्यालय सुरू

राजकुमार थोरात

वालचंदनगर - निरवांगी (ता. इंदापूर) येथे गेल्या 13 वर्षापासुन बंद असलेले तलाठी कार्यालय तातडीने सुरु करण्याचा आदेश इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी दिला. 

इंदापूर तालुक्यातील निरवांगी गावामधून सराफवाडी,पिटकेश्‍वर व दगडवाडी या गावचे तलाठी कार्यालयाचे कामकाम सुरु होते. चार गावांचा सजा एकच असल्याने निरवांगीमधून चारही गावांचे महसूल चे व इतर कामे सुरु होती. मात्र निरवांगीमध्ये गावामध्ये तलाठी कार्यालयाची इमारत नसल्यामुळे गेल्या तेरा वर्षापासुन सराफवाडी गावातून तलाठी कार्यालयाचे कामकाज सुरु होते. यामुळे दगडवाडी व निरवांगी गावातील नागरिकांना, शेतकऱ्यांना सातबारे उतारे, शासकीय दाखले व इतर महसूलच्या कामासाठी सराफवाडी गावामध्ये जावे लागत होते. अनेकवेळा मागणी करुनही निरवांगी गावामध्ये तलाठी येत नव्हते. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील आज गुरुवार (ता. 12) ला येथील पालखी तळाची पाहणी करण्यासाठी अाले असताना ग्रामस्थांनी त्यांना तलाठी कार्यालयाच्या अडचणीसंदर्भात माहिती दिली. पाटील यांनी निकृष्ठ दर्जाच्या तलाठी कार्यालयाची पाहणी केली. तलाठी कार्यालयाच्या इमारतीचे काम 2013 मध्ये पूर्ण झाले आहे. मात्र इमारतीचे काम निकृष्ठ झाले असल्याने ग्रामपंचायतीने इमारत ताब्यात घेण्यास नकार दिला अाहे. इमारत बंद असून इमारतीची दुरावस्था झाली आहे. पाटील यांनी तलाठ्याच्या कामकाजाची माहिती घेवून नव्यान रुजू झालेले तलाठी मदन भिसे यांना तातडीने निरवांगी गावमध्ये तलाठी कार्यालय सुरु करण्याच्या सुचना दिल्या तसेच ग्रामपंचायतीने ही तलाठी कार्यालय सुरु करण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी व तलाठी भिसे यांच्या निवासाची सोय करण्यास सांगितले. यावेळी तलाठी मदन भिसे, ग्रामसेवक संजय भोसले, सरपंच रेखा माने, पोलिस पाटील मारुती रासकर, माजी सरपंच दत्तात्रेय पोळ, शंकर शेंडे, गोपाळ रासकर, महेश रासकर, डाॅ. रमेश गायकवाड, बाळासाहेब कुलकर्णी, अतुल धनवडे उपस्थित होते. 

तहसीलदारचे ग्रामस्थांनी केले कौतुक -
इंदापूर चे तहसीलदार श्रीकांत पाटील यांचे काम करण्याची पद्धत निरवांगीच्या ग्रामस्थांनी अनुभवली. गेल्या 13 वर्षापासुनचा तलाठी कार्यालयाचा प्रश्‍न 13 सेंकदामध्ये सोडविला. काम करण्याचा झपाटा पाहुन ग्रामस्थांनी पाटील यांचे कौतुक करुन अशाच प्रकारच्या अधिकाऱ्यांची तालुक्यासाठी गरज असल्याचे सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT