Kasaba Bypoll Election Esakal
पुणे

Kasaba Bypoll Election : ‘तुझ्या सायबानं सुपारी घेतली, नाचायचं काम कर’, राष्ट्रवादी-मनसेत जुंपली

मनसेच्या पाठिंब्यानंतर पुण्याचं राजकारण तापलं!

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातील चिंचवड आणि कसबा पेठ मतदारसंघासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी मनसेनं आपली भूमिका जाहीर केली आहे.कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राजकारण तापलं असताना मनसेनं (MNS) तटस्थ भूमिका स्वीकारली होती. मात्र, आता मनसेनं आपले पत्ते खोलले असून दोन्ही ठिकाणी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. मनसे भाजपला पाठिंबा देणार आहे. मात्र, प्रचारात सहभागी होणार नाही, असं मनसे नेते बाबू वागस्कर यांनी सांगितलं होतं.

मनसेच्या पाठिंब्यावरुन पुण्याचं राजकारण तापायला सुरू झाली आहे. कारण कसब्यात काँग्रेसचा उमेदवार आहे. पण राष्ट्रवादीचे समर्थक प्रचारात आघाडीवर राहिले आहेत. त्यामुळे मनसेच्या साईनाथ बाबरांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांवर खोचक टीका केली होती. त्याला प्रशांत जगतापांनी आता उत्तर दिलंय.

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यामध्ये ट्विटर वॉर सुरू आहे. बाबर यांच्या आर्वाच्च भाषेतील टीकेवर जगताप यांनी शेलक्या शब्दांत पलटवार केला. शहरातील कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यात हा वाद सुरु झाला आहे.

हा वाद सुरूच असल्याचं दिसून येत आहे. मनसेचे साईनाथ बाबर प्रशांत जगतापांना उद्देशून म्हटले होते की लग्न लोकाचं अन् नाचतायत दुसरेच त्यावर आता साईनाथ बाबरांना जगतापांनी उत्तर दिलंय की बाळा शुद्धीवर ये…तुझ्या सायबानं सुपारी घेतली आहे, तू फक्त मन लावून नाचायचं काम कर.

पुण्यात कसब्यासाठी मनसेकडून याआधी गणेश भोकरे इच्छूक होते. परंतु मनसेने पोटनिवडणुकीत न लढण्याचा निर्णय घेतला. राज ठाकरे यांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला समर्थन देणार असल्याचे जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT